घरदेश-विदेशKolkata : पाळलेली मांजर वाचवता वाचवता 'तिने' गमावला जीव, कोलकात्यातील थरारक घटना

Kolkata : पाळलेली मांजर वाचवता वाचवता ‘तिने’ गमावला जीव, कोलकात्यातील थरारक घटना

Subscribe

कोलकाता : शेजाऱ्याचा कुत्रा सारखा भुंकतो आणि त्याचा त्रास होतो, म्हणून पुण्यातील हडपसर भागात एकाने रागाच्या भरात कुत्र्यावर स्पोर्ट्स गनमधून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. तर दुसरीकडे, आपल्या पाळीव मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका महिलेला जीव गमवावा लागल्याची थरारक घटना कोलकाता येथे घडली आहे.

हेही वाचा – Thackeray vs Shinde : स्वतःचं घर सांभाळू न शकणारे दुसऱ्याच्या घरात डोकावतायेत; उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका

- Advertisement -

इमारतीच्या आठव्या मजल्यावरील ताडपत्रीत मांजर अडकले होते आणि एक महिला तेथून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी ती वरून खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना आज, सोमवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. अंजना दास असे या महिलेचे नाव असून महिनाभरापूर्वीच हे कुटुंब भाड्याने या फ्लॅटमध्ये राहायला आले होते. कोलकात्याच्या टोलीगंज भागात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने सर्वच हळहळले.

लेव्ह अॅव्हेन्यू रोडवर असलेल्या या सोसायटीतील गार्ड आणि इतर लोकांना काही तरी पडल्याचा आवाज आला. सर्वांनी तिथे धाव घेतली तेव्हा अंजना दास जमिनीवर पडलेल्या दिसल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जिला वाचविण्याच्या प्रयत्नात अंजना दास खाली पडल्या, त्या मांजराला इमारतीतील रहिवाशांनी सुखरूप बाहेर काढले.

- Advertisement -

हेही वाचा – सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; अवकाळी नुकसानावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया

अंजना रविवारी संध्याकाळपासून आपल्या मांजरीचा शोध घेत होत्या. हे मांजर ताडपत्रीत अडकल्याचे सोमवारी त्यांना समजले. ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतानाच त्या खाली पडल्या, अशी माहिती आसपासच्या लोकांनी दिली. अंजना यांनी आपल्या चपला काढल्या आणि त्या ताडपत्रीजवळ जाण्याचा प्रयत्न करीत होत्या. यावेळी त्यांचा पाय घसरला आणि त्या जमिनीवर कोसळल्या, असे त्याच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले.

अंजना यांनी साधारणपणे दीड महिन्यांपूर्वी एक मांजर घरी आणले होते. तिने नुकताच तीन पिलांना जन्म दिला होता. अंजना तिच्या वृद्ध आईसोबत येथे राहत होती. ती येथे भाड्याने राहात होती, असे शेजाऱ्याने सांगितले. या कुटुंबाचे वडिलोपार्जित घर सरत बोस रोडवर असून त्याची पुनर्बांधणी सुरू आहे. त्यामुळे विकासकाने त्यांची येथे राहण्याची व्यवस्था केली होती. ते येथे 11 महिने राहणार होते, मात्र त्याच दरम्यान हा अपघात झाला, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. अंजना दास यांचे पती एकत्र राहत नाहीत. त्यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा – NCP Crisis : अजित पवार गटाचे विधानसभा अध्यक्षांच्या नोटीसला उत्तर; म्हणाले- राष्ट्रवादी आमचीच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -