घरदेश-विदेशAir Indiaच्या सुरक्षेत त्रुटी! DGCA ने ठोठावला 1.10 कोटींचा दंड; काय आहे...

Air Indiaच्या सुरक्षेत त्रुटी! DGCA ने ठोठावला 1.10 कोटींचा दंड; काय आहे संपूर्ण प्रकरण

Subscribe

अर इंडियाच्या विमानांमधील सुरक्षेतील त्रुटी समोर आल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मोठा दंड ठोठावला आहे.

नवी दिल्ली: एअर इंडियाच्या विमानांमधील सुरक्षेतील त्रुटी समोर आल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मोठा दंड ठोठावला आहे. DGCA ने बुधवारी काही लांब मार्गांवरील फ्लाइट्सच्या संदर्भात सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याबद्दल एअरलाइनला 1.10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. (Error in security of Air India one crore fine imposed by DGCA What is the whole matter)

डीजीसीएच्या निवेदनानुसार, एअरलाइन कर्मचाऱ्याकडून ऐच्छिक सुरक्षा अहवाल मिळाल्यानंतर नियामकाने तपशीलवार तपासणी केली. यामध्ये काही महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर एअर इंडियाच्या उड्डाणांमध्ये सुरक्षेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. डीजीसीएने म्हटले आहे की तपासात प्रथमदर्शनी एअरलाइनने पालन न केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सुरक्षा अहवाल एअर इंडियाद्वारे चालवल्या जाणाऱ्या भाडेतत्त्वावरील विमानांशी संबंधित आहे.

- Advertisement -

दंड का ठोठावला?

DGCA ने निवेदनात म्हटले आहे की, भाडेतत्त्वावर घेतलेल्या विमानाचे ऑपरेशन नियामक/OEM कामगिरी मर्यादांनुसार नव्हते. त्यामुळे डीजीसीएने अंमलबजावणीची कारवाई करत एअर इंडियाला 1.10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. डीजीसीएने सांगितले की, एअरलाइन्सच्या फ्लाइट ऑपरेशनमध्ये अनेक त्रुटी दिसून आल्या आहेत.

यापूर्वीही दंड आकारण्यात आला होता

डीजीसीएने आठवड्यापूर्वी एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. त्यानंतर कंपनीने पायलट रोस्टर तयार करताना त्रुटी आढळल्या. धुकं असताना विमान कंपन्यांना वैमानिकांचे विशेष रोस्टर बनवावे लागते. यात त्रुटी आढळल्याने DGCA ने Air India आणि Spice Jet. ला दंड ठोठावला होता.

- Advertisement -

दोन्ही कंपन्यांनी डिसेंबरमध्ये रद्द केलेल्या आणि उशीर झालेल्या फ्लाइट्सचा डेटा दिला असता, असे आढळून आले की, धुकं असताना विमान उडवण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेल्या CAT II/III आणि LVTO पात्र वैमानिकांना ड्युटी नेमण्यात आली नव्हती. या वैमानिकांना धुके किंवा खराब हवामानात उड्डाण करण्याचे विशेष प्रशिक्षण मिळते.

(हेही वाचा: Operation Muskaan : शाळेत असताना घर सोडलेला मुलगा मुंबईत सापडला; आता कमवितो लाखो रुपये; वाचा सविस्तर )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -