Monday, April 29, 2024
घरमानिनीबाळाला सर्दी खोकला झालाय? मग हे आहेत ओव्याचे रामबाण उपाय

बाळाला सर्दी खोकला झालाय? मग हे आहेत ओव्याचे रामबाण उपाय

Subscribe

हिवाळा सुरू झाला की वातावरणातील बदलांमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच सर्दी खोकल्याचा त्रास होतो.

हिवाळा सुरू झाला की वातावरणातील बदलांमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच सर्दी खोकला आणि तापाचा त्रास होतो. त्यातही रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने लहान बाळांना याचा सर्वात जास्त त्रास होतो.

- Advertisement -

यामुळे थंडीच्या दिवसात बाळाची विशेष काळजी घ्यावी लागते. बाळाला सतत अॅलोपथीची औषधे देणेही तब्येतीस हानिकारक असल्याने अशावेळी ओवा हा सर्वगुणी ठरतो. जवळपास ० वयोमानापासून अगदी २ वर्षांपर्यंतच्या बाळाला ओव्याचे पाणी, ओव्याचा शेक द्यावा.

- Advertisement -

 

यासाठी नुकत्याच जन्माला बाळाला सर्दी खोकला झाल्यास त्याला त्रास होतो. शिंकता येत नसल्याने त्याच्या छातीत कफ साचू लागतो. अशावेळी मोहरी आणि नारळाचे तेल एकत्र गरम करुन त्याने बाळाची मालिश करावी.

 

त्याला ओव्याचे चार पाच दाणे टाकून उकळलेले पाणी कोमट झाल्यावर ड्रापरने पाजावे.

एका तव्यावर ओवा गरम करुन घ्यावा. त्यानंतर हा गरम ओवा, कापराचे दोन वड्या कॉटनच्या कपड्याची पुरचुंडी करुन त्यात टाकावा.

त्याने बाळाची छाती शेकावी. ओव्याच्या वासामुळे बाळाचे सर्दीने बंद झालेले नाक खुलते. डोळ्यातून आणि नाकातून वाहणारे पाणीही थांबते.

 

 

- Advertisment -

Manini