घरदेश-विदेशWeather Update : देशातील हवामानात होणार बदल, थंडी-पावसाच्या खेळानंतर तापमान वाढीची शक्यता

Weather Update : देशातील हवामानात होणार बदल, थंडी-पावसाच्या खेळानंतर तापमान वाढीची शक्यता

Subscribe

राज्यासह देशातील नागरिकांना अवकाळी पाऊस आणि थंडीपासून दिलासा मिळणार आहे. पुढील 6 ते 7 दिवस तापमानात किंचित वाढ पाहायला मिळणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलू आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये वातावरणात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, या हवामान बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप यांसारख्या समस्या जाणवू लागल्या आहेत. तर हिवाळ्यात अवकाळी पाऊस पडल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारांचाही पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. पण आता पुढील काही दिवसांत देशातून थंडीचा जोर कमी होणार असून अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि वेस्टर्न डिस्टबर्न्सचा परिणाम देशातील हवामानावर पाहायला मिळणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. (Weather Update: Weather change in country, possibility of temperature increase after cold and rain)

हेही वाचा… पालघर नगर परिषदेतर्फे सरासरी १४०२ रुपये प्रति वृक्ष दराने झाली लागवड

- Advertisement -

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यासह देशातील नागरिकांना अवकाळी पाऊस आणि थंडीपासून दिलासा मिळणार आहे. पुढील 6 ते 7 दिवस तापमानात किंचित वाढ पाहायला मिळणार असून शुक्रवारपासून दिल्लीसह उत्तर प्रदेशमध्ये तापमान 20 अंशांवर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर तापमानात यापेक्षा अधिक वाढ होऊ शकते, अशी माहिती देखील देण्यात आली आहे. त्याशिवाय, पहाटे आणि रात्री थंडीचा प्रभाव दिसून येईल. पर्वतीय भागातील कमी बर्फवृष्टीमुळे यावेळी हिवाळा जास्त काळ टिकणार नाही, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे, उत्तर राजस्थानमध्ये सकाळी काही ठिकाणी दाट ते दाट धुके पडण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, जम्मू विभाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर मध्य प्रदेश, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये काही ठिकाणी दाट धुके पडू शकते. पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये काही ठिकाणी थंडीची शक्यता आहे. तर, उत्तर भारतात आज आकाश निरभ्र असेल. सकाळी हलके धुके असेल. दुपारनंतर अंशत: ढगाळ वातावरण असेल. त्तर-पश्चिम भारतात थंडीचे दिवस आणि कडक थंडीचे प्रमाण कमी होणार आहे. पुढील चार ते पाच दिवस सकाळी आणि रात्री दाट धुके कायम राहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -