घरमहाराष्ट्रPatra Chawl Land Scam : संजय राऊतांवर 16 फेब्रुवारीला आरोप निश्चित केले जाणार ?

Patra Chawl Land Scam : संजय राऊतांवर 16 फेब्रुवारीला आरोप निश्चित केले जाणार ?

Subscribe

तब्बल 100 दिवसांनंतर संजय राऊत यांना पीएमएल न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणी संजय राऊत यांना 31 जुलै 2022 रोजी ईडीने अटक केले होते.

मुंबई : कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर 16 फेब्रुवारी रोजी आरोप निश्चित केले जाणार आहे. या घोटाळ्याची आज (18 जानेवारी) मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीला संजय राऊत, तर प्रवणी राऊत यांच्यासह 6 आरोपी न्यायालयात हजर होते.

तब्बल 100 दिवसांनंतर संजय राऊत यांना पीएमएल न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणी संजय राऊत यांना 31 जुलै 2022 रोजी ईडीने अटक केले होते. यात संजय राऊतांना प्रथम ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. अटक केल्यानंतर संजय राऊत यांना पहिले ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या अटकेनंतर संजय राऊत हे आर्थर रोड कारागृहामध्ये आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Ram Mandir : रामलल्लाची मूर्ती आज गर्भगृहात होणार विराजमान, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पुजाविधींना सुरुवात

काय आहे पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा?

महाराष्ट्र सरकारने मुंबईतील गोरेगाव पत्राचाळींमध्ये राहणाऱ्या 672 भाडेकरूंना फ्लॅट देण्याची सरकारी योजना आखली. एचडीआयएलची कंपनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाने भाडेकरूंसाठी सदनिका बांधण्याचे कंत्राट दिले. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन 3 हजार फ्लॅट म्हाडाला देणार होती. चाळीतील 47 एकर जागेवर हे फ्लॅट्स बांधले जाणार होते, पण गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने चाळीतील लोकांसाठी फ्लॅट बांधले नाहीत किंवा म्हाडाला फ्लॅट्स दिले नाहीत. कंपनीने ही जमीन इतर आठ बिल्डर्सना 1034 कोटी रुपयांना विकली. एचडीआयएल कंपनीने केलेल्या या घोटाळ्यांमध्ये प्रवीण राऊत, सारंग वाधवान, राकेश वाधवान यांचा समावेश आहे, असा आरोप आहे. प्रवीण राऊत हा संजय राऊतांचा मित्र असून, ईडीच्या तपासात त्याचे नाव पुढे आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -