घरमनोरंजनAgnidivya : कष्ट-त्याग-समर्पणाचीच गाथा असलेल्या आशिष निनगुरकर यांच्या 'अग्निदिव्य' पुस्तकाचे प्रकाशन

Agnidivya : कष्ट-त्याग-समर्पणाचीच गाथा असलेल्या आशिष निनगुरकर यांच्या ‘अग्निदिव्य’ पुस्तकाचे प्रकाशन

Subscribe

मुंबई : युवालेखक व डाक कर्मचारी आशिष निनगुरकर यांच्या ‘अग्निदिव्य’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला आहे. मुंबईतील साकिनाका पोस्ट कार्यालयात चपराक प्रकाशन निर्मित व आशिष निनगुरकर लिखित ‘अग्निदिव्य’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रम पार पडला. यावेळी साकिनाका पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर प्रदीप माने यांनी आपले मत व्यक्त केले. आशिष निनगुरकर हे एक अत्यंत प्रतिभावंत लेखक व कवी असून त्यांच्या “अग्निदिव्य” या चरित्र पुस्तकातून एका स्त्रीचा स्वतःच्या आस्तित्वासाठी व स्वतःच्या मुलाला हक्क तसेच न्याय मिळवून देण्यासाठी दिलेला लढा, एक संघर्ष या पुस्तकातून वाचायला मिळेल. आमच्या कार्यालयात काम करणारा सहकारी अभिषेक व त्याची आई रमाबाई यांच्या जीवनावर आधारीत एक वास्तव व काळीज पिळवटून टाकणारी कहाणी या पुस्तकातून आशिष यांनी अत्यंत सहजसोप्या शब्दांत मांडली आहे. हे पुस्तक वाचल्यावर नक्कीच अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. आमच्या डाक कार्यालयात असे हरहुन्नरी कलाकार असल्याने आम्हा सहकाऱ्यांना देखील वाचनाबरोबर जगण्याची एक नवी उमेद व ऊर्जा मिळते. ‘चपराक प्रकाशन’ मुळे दर्जेदार लेखन वाचकांपर्यंत येत आहे व प्रतिभासंपन्न लेखक घडत आहेत, असे प्रदीप माने यांच्याकडून आवर्जून सांगण्यात आले. ( Agnidivya: Ashish Ningurkar’s book ‘Agnidivya’, saga of hard work-sacrifice-surrender, has been published)

हेही वाचा… ‘रामायण’ मालिकेतील कलाकार पोहोचले अयोध्येत; चाहत्यांनी केली गर्दी

- Advertisement -

तर, एक स्त्री व तिचा मुलगा अग्नि-तांडवातून कसे जातात, त्या महिलेची होणारी घालमेल त्यात तिचा होणारा छळ या गोष्टी पुस्तक वाचतांना बऱ्याच वेळेस अश्रू अनावर होतात. ‘श्यामची आई’ या पुस्तकानंतर हे पुस्तक आवडले आहे, असे मत लेखक आशिष निनगुरकर यांचे सहकारी प्रविण पवार यांनी व्यक्त केले. हे पुस्तक वाचतांना एका स्त्रीचा लढा केवळ ‘अग्नितांडव’ न राहता तो ‘अग्निदिव्य’ कसा बनत गेला याची प्रचिती होते. कारण पुस्तकाच्या या नावातच या पुस्तकाचा सर्व गाभा दडलेला आहे. एका मुलाची आंतरिक वेदना, एका महिलेचा आभाळाएवढा संघर्ष व समाजमन असे तीन टप्पे युवालेखक आशिष निनगुरकर यांच्या ‘अग्निदिव्य’ या चरित्रात्मक पुस्तकातून वाचायला मिळणार आहेत.

तसेच, रमाबाई कांबळे यांचा जीवनप्रवास अतिशय खडतर होता. तसेच त्यांच्या वाटेत प्रत्येकवेळी काटेच आले आहेत. तरी त्यांनी आत्महत्या न करता, प्रत्येक संकटाला झुगारून सर्व गोष्टींचा सामना केला. हार मानली नाही. अभिषेक व त्यांच्या आईचा जीवनपट किती काळीज फाडून दुःख देणारा आहे, हे पुस्तक वाचल्यावरच तुम्हाला कळू शकेल. संतोष घोंगडे यांनी उत्तम असे मुखपृष्ठ साकारले आहे. लागोपाठच्या संकटांनी तिच्या आयुष्याची परवड झाली. त्यातही ती खंबीरपणे उभी राहिली. संकटांशी दोन हात केले. आपल्या मुलासाठी संघर्ष केला. अनंत अडचणींवर मात केली. मुलाला अर्थार्जनासाठी सक्षम केले. त्याच्या पायावर उभे केले. एका आईचे कर्तव्य पार पाडले. कुठलाही दोष नसताना, गैरसमजाच्या अग्निदिव्यातून जात तिने एक महत्त्वाचा टप्पा गाठला. यात आपले अस्तित्व, ओळख मात्र ती पार विसरून गेली तिच्या कष्ट-त्याग-समर्पणाचीच ही एक गाथा-गाथा अग्निदिव्याची. याच चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन उत्तमरीत्या संपन्न झाले. यावेळी कर्मचाऱ्यांनी ‘वाचन चळवळ वाढवण्यासाठी’ संकल्प केला व पुस्तक आदान-प्रदान उपक्रम सुरू केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल मेढे यांनी केले तर आभार सूर्यकांत देसाई यांनी मानले.

- Advertisement -

‘अग्निदीव्य’ पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम चपराक प्रकाशन कार्यालयीन सहकारी भूषण बेर्डे, महेश बहिरमल, रमेश कुमार, अक्षय मालकर, राजू रणवीर, सूर्यकांत देसाई, प्रवीण पवार, पोस्टमास्तर प्रदीप माने, लेखक आशिष निनगुरकर, अशोक अडसूळ, रचना शिर्के, विशाल मेढे, अतुल तिवारी व उदय भागवत या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

‘अग्निदिव्य’ पुस्तक विक्रीचा नवा विक्रम करेल…

लेखक आशिष निनगुरकर यांच्या लेखनात एक मोठी ताकद आहे. त्यांनी पुस्तकात मांडलेले वर्णन डोळ्यासमोर उभे रहाते.या पुस्तकाला वाचकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे व ‘अग्निदिव्य’ हे पुस्तक विक्रीचा तसेच पुरस्काराचा एक नवा विक्रम करेल हा विश्वास वाटतो, असे ‘चपराक प्रकाशन’चे पुण्याचे प्रकाशक घनश्याम पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -