Sunday, April 28, 2024
घरमानिनीReligiousपुराचे (Flood) मोजमाप करण्यासाठी या मारुतीचा उल्लेख केला जातो

पुराचे (Flood) मोजमाप करण्यासाठी या मारुतीचा उल्लेख केला जातो

Subscribe

नाशिक मध्ये पुराचे मोजमाप करण्यासाठी गंगा गोदावरी च्या पात्रातील एका मारुतीचा उल्लेख केला जातो त्या मारुतीचे नाव काय दुतोंड्या मारूती आहे.

रामकुंडाजवळील हा मारुती 25 फुट उंच नदी पात्रात नाशिक व पंचवटी कडे तोंड करुन उभा आहे. गोदावरी चे पुराचे पाणी मोजण्याचे नाशिकरांचे एक खास प्रमाण आहे. मारुतीच्या पायाला, घुडध्याला, कमरेला आणि छातीला पाणी लागले म्हणजे पुर यायला सुरवात झाली दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला म्हणजे पुर आला. लोक विचारतात मारुतीच्या कुठपर्यत पाणी आहे. यावरुन पुराच्या पाणाचा अंदाज करता येतो. (nashik flood)  नाशिकमधील गोदावरीलाचा पूर ओसरला, दुतोंड्या मारुती पाण्याबाहेर नाशिकमधील पूरस्थिती लक्षात घ्यायची असेल तर दुतोंड्या मारूती त्याचा मापदंड मानला जातो. अख्खा मारुती जर पाण्यात बुडाला तर धोक्याची परिस्थिती निर्माण झाली असं सांगितलं जातं. यापूर्वी 1972 च्या पुरात दुतोंड्या मारूती पुराच्या पाण्यात अख्खा बुडून पुराचं पाणी नारो शंकराच्या मंदिरावरील घंटेला लागलं होतं. अशी आठवण गोदावरीला पूर आला की आवर्जून सांगितली जाते.⁠⁠⁠⁠

- Advertisement -

गोदावरी घाटावर ज्या काही वास्तू नजरेत भरतात, त्यात प्रामुख्याने दुतोंड्या मारुती चा समावेश होतो.

 

- Advertisement -

रामकुंड आणि नारोशंकर मंदिराच्या मध्यभागी अह्ल्याराम व्यायामशाळेजवळ दुतोंड्या मारुती चे शिल्प १९४२ च्या सुमारास उभारण्यात आले. या दुतोंड्या मारुती चा इतिहास तसा रंजक आहे. सध्या जेथे देवमामलेदार यशवंतराव महाराजांचे मंदिर आहे, त्याच्या पाठीमागील बाजूस पूर्वी यशवंत व्यायामशाळा होती. त्याच व्यायामशाळे जवळ दुतोंड्या मारुती ची साडे सात फुटी दगडी मूर्ती होती.

सदर मूर्ती भांग्ल्याने, त्यावेळच्या कार्यकारिणी ने नवीन दगडी मूर्ती घडविण्याचा निर्णय घेतला; मात्र त्या वेळी मूर्ती ११ फुटी करण्याचा आग्रह करण्यात आला. त्यानुसार त्यावेळचे प्रख्यात मूर्तिकार आबाजी दादाजी भोइर यांच्याकडे मूर्तीविषयी विचारणा झाली. परंतु ११ फुटी दगडी मूर्तीबाबत आबाजी भोइर यांनी नथुराम भोइर यांचे नाव सुचविले.

कार्यकारणी ने नथुराम भोइर यांच्याकडे विचारणा केली, परंतु मूर्तीचा खर्च अधिक सांगितला गेल्याने कार्यकारणी ने मूर्तिकार शंकरराव परदेशी यांना काम दिले, परदेशी यांनी दुतोंड्या मूर्तीची आखणी केली आणी कामाला सुरवात केली; परंतु कामाला गती काही मिळेना.

शेवटी कार्यकारणी ने पुन्हा एकदा नथुराम भोइर यांना साकडे घातले आणि परदेशी यांनी केलेल्या मूर्तीचे काम भोइर यांनी पुढे सुरु केले. संपूर्ण मूर्ती सिमेंट मध्ये घडविण्यात आली असून मूर्तीला पुरापासून धोका होऊ नये म्हणून बाबुराव भोइर यांनी मूर्तीभोवती त्रिकोणी कोन चे काम केले.

आज हाच दुतोंड्या मारुती गोदावरीला आलेल्या महापुराची तीव्रता मोजण्याचे एक साधन बनला आहे. याच दुतोंड्या मारुतीची प्रतिकृती गोदावरी नदीवरच दसक येथील पात्रात सुरेश भोइर यांनी आपल्या कुशल हातांनी केली आहे.

- Advertisment -

Manini