घरमहाराष्ट्रVarsha Gaikwad : पहिल्याच पावसात मुंबई तुंबली, जबाबदार कोण? वर्षा गायकवाडांचा मुख्यमंत्र्यांना...

Varsha Gaikwad : पहिल्याच पावसात मुंबई तुंबली, जबाबदार कोण? वर्षा गायकवाडांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Subscribe

 

मुंबई: मुंबईत पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या नालेसफाईच्या कामावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व पालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा झाला आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात मुंबईतील सखल भागात पावसाचे पाणी साचले. त्याचा रस्ते वाहतुकीवरही परिणाम होऊन मुंबईकरांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

- Advertisement -

मुंबईची तुंबई झाल्याने सत्ताधारी व पालिका प्रशासन यांचे दावे फोल ठरले आहेत. त सर्व घटनाप्रकाराला जबाबदर कोण? असा सवाल त्यांनी त्याचे उत्तर आपल्या ट्विटरद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. तसेच, मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या प्रश्नाचे उत्तर द्यावे, अशी मागणीही केली आहे.

- Advertisement -

हेही वाचाःधक्कादायक : मुंबईत पहिल्याच पावसात मॅनहोलमध्ये पडून दोघांचा मृत्यू; नालेसफाईची पोलखोल

मुख्यमंत्री महोदय आम्ही आपणांस यापूर्वीच सांगितलं होतं की, मुंबईत नालेसफाईच्या आणि मान्सूनपूर्व कामांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा करण्यात आला आहे. परंतु त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही.
पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांनी मान्सूनपूर्व तयारीचे केलेले सर्व दावे फोल ठरले आहेत. राज्यातील सत्ताधारी सरकार व त्यांचे अधिकारी हे धादांत खोटं बोलणारे आहेत, असा आरोपही वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

अगदी पहिल्याच पावसात अंधेरी सबवे, एलबीएस मार्ग, साकीनाका ९० फिट रोड, माटुंगा, पश्चिम द्रुतगती मार्ग तसेच महालक्ष्मी, दादर, माहीम, धारावी, परळ, शिव, किंग सर्कल, कुर्ला, चेंबूर, अंधेरी, मुलुंड, दहिसर आदी ठिकाणच्या सखल भागांत पाणी साचल होते. परिणामी, नागरिकांची मोठी गैरसोय होत असून त्यांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जो नाहक त्रास सहन करावा लागत आहे याला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित करीत वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे उत्तर देण्याची मागणी केली आहे.

मुंबईत पावसाची दणक्यात सुरुवात; 48 तासांत मान्सून सक्रिय

गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने शनिवारी मुंबईत दणक्यात सुरुवात केली. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसाने दिलासा दिला. विकेंडला पाऊस पडल्याने बच्चे कंपनीने पावसाचा मनमुराद आनंद लुटला. पावसाची मज्जा लुटण्यासाठी चौपट्याही हाऊसफुल्ल झाल्या होत्या. त्यात हवामान विभागानेही मुंबईकरांना खुशखबर दिली. येत्या 48 तासांत मान्सून मुंबईत सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -