घरमनोरंजनNayantara : 20 दिवसांनंतर नयनतारा तिच्या कुटुंबियांना भेटली

Nayantara : 20 दिवसांनंतर नयनतारा तिच्या कुटुंबियांना भेटली

Subscribe

नयनतारा ही साऊथची आघाडीची अभिनेत्री आहे. दाक्षिनात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नयनताराला लेडी सुपरस्टार म्हटले जाते. या अभिनेत्रीचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. ‘जवान’ चित्रपटानंतर तीची लोकप्रियता बॉलिवूडमध्येही खूप वाढली. हा चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नयनतारा सोशल मीडियावर अनेकदा तिच्या कुटुंब तसेच तिची मुले उइर आणि उलागम यांसोबतचे फोटोस शेअर करत असते. अलीकडेच, नयनताराने सोशल मीडियावर त्यांच्या चार जणांच्या कुटुंबाचे मनमोहक फोटो शेअर केले आहेत.

सिंगापूरमध्ये 20 दिवसांच्या चित्रपटाच्या शूटिंगमधून परतल्यानंतर नयनताराने सोशल मीडियावर तिच्या कुटुंबासह एक फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “20 दिवसांच्या शेड्यूलनंतर जेव्हा आम्ही तिघांना पाहिले तेव्हा आम्हा तिघांना कसे वाटले सांगू शकत नाही! आम्हाला तुमची खूप आठवण येते! तितकाच आनंदी झालेल्या विघ्नेशने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आनंदी क्षण शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “जर प्रेमाचे चेहरे असते, माझे उयिर आणि उलागम”

 

View this post on Instagram

 

A post shared by N A Y A N T H A R A (@nayanthara)

- Advertisement -

 नयनतारा आणि विग्नेश 2015 साली ‘नानुम राउडी’ या सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. विग्नेश या चित्रपटाचा दिग्दर्शक होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. 6 वर्षांच्या डेटिंगनंतर नयनतारा आणि विग्नेशने लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2022 मध्ये ते लग्नाच्या बेडीत अडकले होते. नयनतारा आणि विघ्नेश यांनी 9 जून रोजी चेन्नईत लगीनगाठ बांधली. त्यानंतर सरोगसी पद्धतीने त्यांना जुळी मुले झाली आहेत. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांच्या लग्नाला सुपरस्टार शाहरुख खान, विजय सेतुपती आणि दिग्दर्शक अॅटली यांनी हजेरी लावली होती.

नयनतारा शाळेत असल्यापासून मॉडेलिंग करते. 2003 मध्ये तिने मल्याळम ‘मनास्सिनाकरे’ सिनेमातून सिने इंडस्ट्रीत डेब्यू केला होता. त्यानंतर तिने सातत्याने अनेक हिट चित्रपट दिले. तिचा पहिलाच सिनेमा हिट ठरला. अभिनेत्रीने आपल्या सिनेमांनी साऊथ इंडस्ट्रीत तुफान लोकप्रियता मिळवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -