घरठाणेLok Sabha 2024 : काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राजीनामा देण्याचा इशारा, काय आहे कारण?

Lok Sabha 2024 : काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राजीनामा देण्याचा इशारा, काय आहे कारण?

Subscribe

बदलापूर : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन 10 दिवस उलटले आहेत. 17 एप्रिलला महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. पण अद्यापही महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यांच्यातील जागावाटपाचा तिढा सुटू शकलेला नाही. मविआमध्ये तर काही जागांवरून आजही पेच कायम आहे. काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी तर काही जागा या पक्षालाच मिळाव्यात असा अट्टहास लावून धरला आहे. अन्यथा पक्षाचा राजीनामा देण्याचा इशाराही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे. भिवंडी लोकसभेबाबत असाच मोठा पेच काँग्रेससमोर निर्माण झाला आहे. (Lok Sabha 2024 : Congress office bearers warning to resign)

हेही वाचा… Rashmi Barve : रामटेकमध्ये काँग्रेसला धक्का, लोकसभा उमेदवार रश्मी बर्वेंचे जात प्रमाणपत्र रद्द

- Advertisement -

भिवंडी लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत मोठा पेच निर्माण झाला आहे. भिवंडी हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे. पण गेल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेसचा येथे सातत्याने पराभव होत असल्याने या लोकसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दावा करण्यात आला आहे. पण यामुळे भिवंडी आणि ठाणे जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भिवंडी लोकसभेवर दावा केल्यानंतर काँग्रेसने याला विरोध केला आहे. कोकण विभागात ही एकमेव जागा आता काँग्रेसच्या ताब्यात राहिली आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच द्यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही. तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील, असा इशारा बदलापूर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.

भिवंडी लोकसभेतून महायुतीकडून पुन्हा एकदा म्हणजेच तिसऱ्यांदा खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते सलग दोनवेळा या मतदारसंघातून विजयी होऊन आले आहेत. त्यामुळे भाजपाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवत या जागेवरची उमेदवारी त्यांना देऊ केली आहे. पण त्यांच्या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. पण तरी देखील कोणत्याही गोष्टीचा विचार न करता उमेदवारी मिळताच कपिल पाटील यांनी महायुतीच्या घटक पक्षांशी चर्चा आणि भेटीगाठी सुरू केल्या. कपिल पाटील यांना भाजप आणि शिवसेनेतून विरोध करणारा एक गट असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -