घरपालघरमुली पुरवणार्‍या महिला वेश्यादलालाला अटक

मुली पुरवणार्‍या महिला वेश्यादलालाला अटक

Subscribe

महिला आरोपी वेश्यादलाल नगमा उर्फ जसप्रित उर्फ निलम अजीतकुमार सांशी हिच्या विरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदर :- मीरा -भाईंदर परिसरात वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुली पुरवणार्‍या महिला वेश्या दलालावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष- भाईंदर पथकाने छापा टाकून वेश्या दलाल महिलेला अटक केली आहे. तिच्या तावडीतून १ अल्पवयीन व २ प्रौढ पिडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. मीरा- भाईंदर आणि इतर ठिकाणी महिला वेश्यादलाल नगमा खान ही वेश्याव्यवसाय करत असून ती व्हॉटसअ‍ॅपव्दारे पुरुष गिर्‍हाईकांना अल्पवयीन व प्रौढ मुलींचे फोटो पाठवून, वेश्यागमनासाठी अल्पवयीन व प्रौढ मुली पुरवत असल्याची माहिती भाईंदरच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने बोगस गिर्‍हाईक व दोन पंच बोलावून महिला वेश्यादलाल नजमा उर्फ जसप्रित उर्फ नीलम सांशी हिने सांगितल्याप्रमाणे अ‍ॅक्वा फॅमिली रेस्ट्रो बार, निरा कॉम्पलेक्स, न्यु गोल्डन नेस्ट, भाईंदर पूर्व या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात महिला वेश्यादलाल नगमा उर्फ जसप्रित उर्फ निलम अजीतकुमार सांशी ( २६ ) वर्षे हिने एक अल्पवयीन मुलगी व दोन प्रौढ मुलींना पुरुष गिर्‍हाईकास वेश्यागमनासाठी घेऊन आली असता तिला सापळ्यातील रोख रक्कम व इतर मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. तिने आणलेल्या १ अल्पवयीन व २ प्रौढ पिडित अशा ३ मुलींची सुटका केली आहे. महिला आरोपी वेश्यादलाल नगमा उर्फ जसप्रित उर्फ निलम अजीतकुमार सांशी हिच्या विरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -