घरमहाराष्ट्रVarsha Gaikwad : सगळेच पात्र, न्याय मात्र अपात्र; राष्ट्रवादीच्या निकालावर वर्षा गायकवाड...

Varsha Gaikwad : सगळेच पात्र, न्याय मात्र अपात्र; राष्ट्रवादीच्या निकालावर वर्षा गायकवाड संतप्त

Subscribe

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाच्या वाचनास अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 4 वाजून 50 मिनिटाला सुरुवात केली. निकाल वाचन त्यांनी इंग्रजीतूनच केलं. निकाल वाचनात अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी 41 आमदारांचे बहुमत अजित पवार यांच्याकडे त्यामुळे अजित पवार गटाला शरद पवारांपेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे.

मुंबई : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला. या निकालात अजित पवार यांच्याकडे 41 आमदारांचे पाठबळ आहे. विधिमंडळ पक्षामध्ये बहुमत हा एकमेव निकष असतो असं सुरुवातीच्या वाचनामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हटलं. तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवत राष्ट्रवादी हा पक्ष अजित पवार गटाचाच असल्याचा निकाल त्यांनी दिला. या निकालावर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाडांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (Varsha Gaikwad All Deserving Justice Undeserved Varsha Gaikwad angry over NCPs result)

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाच्या वाचनास अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 4 वाजून 50 मिनिटाला सुरुवात केली. निकाल वाचन त्यांनी इंग्रजीतूनच केलं. निकाल वाचनात अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी 41 आमदारांचे बहुमत अजित पवार यांच्याकडे त्यामुळे अजित पवार गटाला शरद पवारांपेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच असून, अजित पवांराचा गट हीच खरी राष्ट्रवादी आहे असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Supriya Sule : कॉपी पेस्ट निकालावर काय बोलणार? सुळेंनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना सुनावले खडेबोल

- Advertisement -

हवं तेच घडवून आणले हट्टी राजाने

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर पोस्टमध्ये लिहिले की, सगळेच पात्र, न्याय मात्र अपात्र- भाग 2 अशी सुरुवात त्यांनी पोस्टची केली आहे. पोस्टमध्ये पुढे लिहिले की, हवं तेच घडवून आणले हट्टी राजाने, लोकशाहीला चिरडून हसतोय मोठ्या माजाने. पण शेवटी खरे कोण आणि खोटे कोण? हे अखेर जनतेच्या कोर्टात ठरणारंच आहे. खरी लढाई जनतेच्या कोर्टात होईलच. जनता सत्याच्या अर्थात शरद पवार आणि महाविकास आघाडीच्याच पाठीशी खंबीर उभी राहीन. जनतेच्या कोर्टात गद्दारांना क्षमा नाही अशी संतप्त प्रतिक्रिया यांनी दिली आहे.

हेही वाचा : Rajya Sabha Election : पहिलीच निवडणूक… तिकीट आयारामाला…; सच्चा शिवसैनिक राहिला तसाच

शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे आमदार पात्र

मूळ राष्ट्रवादी कुणाची याबाबत आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे. राष्ट्रवादी हा पक्ष अजित पवार गटाला देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेच्या निकालासाऱखेच दोन्ही गटांचे आमदार पात्र ठरविले. 10 जानेवारी रोजी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देताना दोन्ही गटांचे आमदार पात्र ठरविले होते. त्याच निकालाची पुनरावृत्ती राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकाल देताना केल्याचे दिसून येतेय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -