Saturday, April 27, 2024
घरमानिनीRelationshipअनैसर्गिक लैंगिक संबंधांना द्या नकार, गर्भाशय होईल Damage

अनैसर्गिक लैंगिक संबंधांना द्या नकार, गर्भाशय होईल Damage

Subscribe

नातेसंबंध बनवताना माहितीच्या अभावामुळे काही वेळा पती-पत्नी (wife-husband) अशा चुका करतात, ज्याचा परिणाम त्यांच्या नात्यासोबतच त्यांच्या आरोग्यावरही होतो. हेल्दी सेक्शुअल रिलेशनसाठी (Healthy Sexual
Relationship), आपले नाते तसेच शरीर समजून घेणे महत्त्वाचे आहे. एकमेकांच्या इच्छा तसेच जोडीदाराचे शरीर समजून घेणे हा सोपा मार्ग आहे, असे सेक्सोलॉजिस्ट डॉ. राजन भोसले असे म्हणतात.

माझ्या नवऱ्याला एक्सपेरिमेट करायला आवडतात. पण, काही वेळा ते अशा मागण्या करतात जे मला आवडत नाही. पतीला अनैसर्गिक संबंध ठेवायला आवडतात, पण मला ते आवडत नाही. मला जाणून घ्यायचे आहे की, पती-पत्नीमध्ये अनैसर्गिक संबंध असणे आवश्यक आहे का? यात काही अडचण येईल का?

- Advertisement -

डॉ. राजन भोसले म्हणतात की, शारीरिक संबंधांमध्ये दोन्ही जोडीदारांची इच्छा आणि आनंद खूप महत्त्वाचा असतो. एखाद्याच्या जोडीदाराचा आनंद दुसऱ्यासाठी शिक्षा ठरला तर त्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर होतो. जेव्हा पती-पत्नी दोघेही एकमेकांच्या भावनांची काळजी घेतात. तेव्हाच निरोगी लैंगिक संबंध शक्य होतात. अनेक पुरुष त्यांच्या पत्नींकडून ओरल ओरल सेक्सची मागणी करतात, परंतु अनेक महिला यासाठी तयार नसतात, असे केल्यावर अनेक महिलांना उलट्या होऊ लागतात.

जर तुम्हाला अनैसर्गिक संबंध ठेवायला आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या पतीशी त्याबद्दल मोकळेपणाने बोलले गजचे आहे. जेव्हा ओरल सेक्सचा प्रश्न येतो, तेव्हा पत्नीची इच्छा असूनही जर स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर पती-पत्नी दोघांनाही संसर्ग होऊ शकतो.

- Advertisement -

जर दोन जोडीदारांपैकी एकाला संसर्ग झाला असेल तर दोघांवर उपचार करावे लागतील, अन्यथा एक जोडीदार दुसऱ्या जोडीदाराला संसर्ग देऊ शकतो आणि दोघांवर पुन्हा उपचार करावे लागतील. संसर्ग सामान्यतः उपचार करणे खूप सोपे आहे आणि औषधे घेऊन ते बरे होऊ शकतात. पण, उशीर झाल्यास ते धोकादायकही ठरू शकते, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका.

जर तुम्ही तुमच्या पतीला आरोग्याच्या धोक्याबद्दल सांगून समजावून सांगितले तर तो तुमचा मुद्दा समजेल आणि भविष्यात अनैसर्गिक संबंध ठेवण्याची मागणी करणार नाही. हेल्दी सेक्शुअल रिलेशन संबंधासाठी, टेकनीकपेक्षा जास्त प्रेम महत्त्वाचे आहे. जर दोन्ही जोडीदारांमध्ये प्रेम असेल तर ते दुसऱ्या जोडीदाराच्या शरीराला कोणतीही हानी पोहोचवू देत नाहीत. त्यासाठी तुम्ही तुमच्या पतीला समजेल आणि तुझी समस्या दूर होईल.

गेल्या काही दिवसांपासून मला माझ्या वजाइनल डिस्चार्जतून दुर्गंधी येत आहे. यामुंबई संबंध ठेवताना मला खूप लाज वाटते. हे काही आजाराचे लक्षण आहे का? यामुळे नवऱ्याला काही धोका तर होणार नाही ना? यासाठी मी डॉक्टरांना भेटावे का?

डॉ. राजन भोसले सांगतात की, सहसा संबंध ठेवताना डिस्चार्ज होणे सामान्य आहे. हे लुब्रिकेशन होते आणि संबंध होणे सोपे होते. पण, वजाइनल डिस्चार्ज वास येणे हे सामान्य नाही. हे संसर्गाचे लक्षण असू शकते. जर वजाइनल इिस्चार्जचा रंग किंवा वास बदलला तर ते संसर्गाचे लक्षण आहे.

वजाइनल डिस्चार्जवर उपचार घेण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. महिलांमध्ये वजाइनल इन्फेकशन खूप धोकादायक असू शकतो. लवकर उपचार घेतल्यास काही अडचण नाही, पण इन्फेक्शन वाढला तर गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब डॅमेज होण्याची शक्यता असते, उशीर न करता त्वरित उपचार करून घ्यावेत. तुमच्यामुळे तुमच्या पतीलाही संसर्ग होऊ शकतो.


हेही वाचा – पार्टनरबरोबर safe sex बदद्ल बोलायलाचं हवं

- Advertisment -

Manini