घरपालघरराष्ट्रपती महिला असूनही मणिपूरच्या घटनेवर बोलत नाहीत

राष्ट्रपती महिला असूनही मणिपूरच्या घटनेवर बोलत नाहीत

Subscribe

माणिकपूर नाका ते नवघर बस स्थानकाहून निघालेल्या मोर्चानंतर पार्वती क्रॉस येथे जाहिर सभा घेण्यात आली. यावेळी बोलताना डॉ. कार्व्हालो यांनी मणिपूर आणि केंद्र सरकारवर कडक शब्दात टिका केली.

वसईः मणिकपूरमधील घटनेनंतरचा संघर्ष धार्मिक अस्मितेच्या नावाने पेटवला जात आहे. त्या महिलेला हत्यार केले गेले आहेत. देशाच्या राष्ट्रपती महिला असूनही त्या या घटनेवर बोलत नाहीत, याची खंत वाटते, अशा शब्दात ख्यातनाम साहित्यिका डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी वसईत निघालेला निषेध मोर्च्यात बोलताना निषेध नोंदवला. मणिपूर येथील महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ ऑल इंडिया डेमोक्रॅटीक वुमन्स असोसिएशनच्या जनवादी संघटनेच्यावतीने वसईत महिलांचा निषेध मोर्चा काढण्यात आला. माणिकपूर नाका ते नवघर बस स्थानकाहून निघालेल्या मोर्चानंतर पार्वती क्रॉस येथे जाहिर सभा घेण्यात आली. यावेळी बोलताना डॉ. कार्व्हालो यांनी मणिपूर आणि केंद्र सरकारवर कडक शब्दात टिका केली.

गेले 80 दिवस झाले मणिपूर पेटलेले आहे. तीन महिलांना विवस्त्र करून हजारो पुरुषांसमोर त्यांची लाज लुटण्यात आली. एकाही पुरुषाला वाटू नये. आपला शर्ट काढून त्या महिलांच्या अंगावर टाकावा, इतक्या आमच्या संवेदना बोथट झाल्या आहेत?. याची घृणा करावी तितकी कमीच आहे. त्यांच्या अब्रूवर पडलेला हात हा संपूर्ण देशाच्या महिलांवर पडलेला हात होता. हे राजकारण नाही, तर हा सत्ता संघर्ष आहे. तो धार्मिक अस्मितेच्या नावाने पेटवला जात आहे. आणि त्यात महिलेला हत्यार केले गेले आहे. याप्रकरणी आतापर्यंत गप्प असलेल्या मणिपूर सरकार आणि मोदी सरकारचा मी धिक्कार करते, अशा शब्दात कार्व्हालो यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सुशिक्षित समाजातही माता, भगिनी असलेल्या महिलांचा आवाज दाबला जात आहे. शस्त्रांचा धाक दाखवून बोलू दिले जात नाही. बाई ही शेवटी एक व्यक्ती आहे. तिचा आणि तिच्या स्वातंत्र्याचा सन्मान हा झालाच पाहिजे. मणिपूरच्या घटनेमुळे महिलांची घोर विटंबना झाली असून, त्यास पूर्णपणे सत्तेवरील भाजप सरकारे जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

- Advertisement -

सिस्टर फातिमा, सामाजिक कार्यकर्त्या डॉमिनिका डाबरे, संघटनेच्या पदाधिकारी प्रीती शेखरन व अंजू दिवे , जयश्री सामंत, जेनेट सीरिजो यांचीही यावेळी भाषणे झाली. गुन्हेगारांना फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोरातील कठोर शिक्षा केली जावी. तेथे उपस्थित जबाबदार पोलिसांवर कडक कारवाई केली जावी. मणिपूरचे मुख्यमंत्री वीरेंद्र सिंग यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा आणि मणिपूर राज्य शांत करण्यात यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -