Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthथंडीत बाळाला किती कपडे घालायचे?

थंडीत बाळाला किती कपडे घालायचे?

Subscribe

थंडीचे दिवस सुरु असतील आणि घरात लहान बाळ असेल तर अनेक पालकांना बाळाची काळजी कशी घ्यायची हे समजत नाही. थंडीपासून बाळाचे रक्षण करण्यासाठी नक्की कोणते आणि किती कपडे घालावे, असे अनेक प्रश्न पालकांना भेडसावत राहतात. पण थंडीपासून बाळाचे संरक्षण व्हावं यासाठी तज्ज्ञांनी काही टिप्स दिल्या आहेत.

बदलत्या हवामानाचा सर्वात पहिला परिणाम या आरोग्यावर होतो. नवजात बाळाच्या बाबतीत तर ही समस्या जाणवतेच. पण तज्ज्ञांनी सांगितलेल्या टिप्स आपण फॉलो केल्या तर आपण लहान बाळांचे थंडीपासून संरक्षण करू शकतो.

- Advertisement -

The 5 Best Fabrics for Baby Clothes and Accessories - The Wee Bean

कपड्याचा पहिला थर कॉटनचा असावा
जेव्हा तुम्ही बाळाला थंडीत कपडे घालाल तेव्हा पहिला थर हा सुती कापडाचा असुद्या. असे केल्याने बाळाच्या त्वचेला स्पर्श करणारे कपडे हे सुती असतील. याने बाळाच्या त्वचेला पुरळ उठण्याची समस्या उदभवणार नाही. जर तुम्ही बाळाला लोकरीचे स्वेटर घातल्यास ते बाळाच्या त्वचेसाठी हानिकारक ठरून त्वचेवर पुरळ येण्याची शक्यता जास्त असते.

- Advertisement -

उबदार कपड्यांचे थर किती असावेत?
हिवाळयात लहान बाळांना नक्की किती उबदार कपडे घालावेत, असा प्रश्न अनेक पालकांना भेडसावत असतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बाळाला थंडीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आराम टिकवून ठेवण्यासाठी बाळाला उबदार कपड्यांचा थर घालण्यापेक्षा आईने उबदार कपडे घालावेत. विशेष करून बाळाला घातलेल्या उबदार कपड्यापेक्षा एक थर आईने जास्त घालावा.

बाळाला उबदार कपडे आवश्यक आहेत की नाही हे कसे ओळखाल?
तुमच्या बाळाला उबदार कपड्यांमध्ये थंडी जाणवत आहे का? किंवा थंडीपासून बचावासाठी त्याला अधिक उबदार कपड्यांची गरज आहे का? हे जाणून घेण्याची तज्ज्ञांची पद्धत खूप सोपी आहे. सर्वात पहिले पालकांनी बाळाच्या हाताला किंवा पायाला स्पर्श करून तपासणी करावी. यानंतर बाळाच्या पायाचे किंवा हाताचे तळवे हे त्याच्या पोटापेक्षा थंड असतील तर याचा अर्थ असा की त्याला थंडी जाणवत आहे. त्यानुसार तुम्ही बाळाला उबदार कपडे घालू शकता.

 


हेही वाचा ; गरोदरपणात वाढलेले वजन ‘या’ सोप्या पद्धतीने करा कमी

- Advertisment -

Manini