घरदेश-विदेशWeather Update : महाराष्ट्रात गारठा वाढला, उत्तर भारताला थंडीच्या लाटेचा फटका

Weather Update : महाराष्ट्रात गारठा वाढला, उत्तर भारताला थंडीच्या लाटेचा फटका

Subscribe

वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे उत्तर भारतात कालपासून तीव्र थंडीची लाट पसरली असून यामुळे दाट धुक्यांची चादर संपूर्ण उत्तर भारतावर पसरली आहे. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा घसरू लागला आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत देशातील अनेक राज्यांच्या तापमानामध्ये कमालीची घट पाहायला मिळत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे उत्तर भारतात कालपासून तीव्र थंडीची लाट पसरली असून यामुळे दाट धुक्यांची चादर संपूर्ण उत्तर भारतावर पसरली आहे. तापमानात घट झाल्याने आता अनेक भागांत बर्फवृष्टीला देखील सुरुवात झाली आहे. तर उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने अनेक राज्यांमध्ये हवामान खात्याकडून थंडीचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. काश्मीरच्या खोऱ्यातही बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा घसरू लागला आहे. नाशिक, पुणे, छत्रपती संभाजी नगर, सातारा, महाबळेश्वर या भागांत थंडीची हुडहुडी भरू लागली आहे. परंतु, सध्या सर्वाधिक बिकट परिस्थिती ही उत्तर भारतात असून येथील अनेक शहरांमध्ये धुक्यांची दाट चादर पसरली असून यामुळे दृष्यमानता कमा झालेली आहे.

हेही वाचा… अटल सेतूवर गाडी थांबवणं पडेल महागात; कारण पाहा व्हिडीओ!

- Advertisement -

भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तरेकडे थंडी आणि दाट धुके पुढील पाच दिवस कायम राहणार आहेत. पर्वतीय भागात सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे मैदानी भागात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दाट धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाली असून वाहन चालकांना प्रशासनाकडून वाहन सावकाश चालविण्याचे आवाहन केले जात आहे. दृष्यमानता कमी झाल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. दिल्लीतील अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या असून विमान उड्डाणेही उशिराने सुरू आहेत.

दिल्लीत ही थंडीची लाट आल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीत काल मंगळवारी (ता. 16 जानेवारी) गारठ्यासह दाट धुक्यांची टादर पाहायला मिळाली. या दाट धुक्यांचा मोठा परिणाम हा विमान वाहतुकीवर झाल्याचे पाहायला मिळाला. घसरत्या तापमानाचा आणि धुक्याच्या चादरीचा परिणाम हा रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. ज्यामुळे राजधानी एक्स्प्रेससारख्या गाड्याही 15 तासांहून अधिक उशिराने धावत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, पालम विमानतळावर सकाळी 7 वाजता 100 मीटर दृश्यमानता नोंदवली गेली, तर सकाळी 7:30 वाजता दृष्यमानता 0 मीटरवर घसरली होती. सफदरजंग विमानतळावर सकाळी 7 आणि 7.30 वाजता 50 मीटरपर्यंत दृश्यमानता नोंदवण्यात आल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

आधी अवकाळी पाऊस आणि आता तापमानातील पाऱ्यात झालेली घसरण यामुळे शेतीला मोठा फटका बसत आहे. उत्तर प्रदेशासह काही राज्यांमध्ये रब्बी पिकांचा हंगाम सुरू झाला आहे. पुढील दोन-तीन दिवस उत्तर प्रदेशात तापमानात घट, दाट धुके आणि तुरळक पाऊस पडण्याची शक्यता विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे कृषी संशोधन परिषदेने शेतकर्‍यांना प्रतिकूल हवामानापासून पिके वाचवण्यासाठी उपाय सुचवले जात आहेत. परंतु, हवामानात सातत्याने होणारा बदल हा पिकांसाठी मोठा धोका ठरत आहे. गेल्या 15 दिवसांपासून उत्तर प्रदेशात गारठा वाढत चालला आहे. ज्यामुळे आता याचा परिणाम शेतीवर होऊ लागला असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -