घरमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज

Subscribe

कोल्हापूर आणि सांगलीमध्ये 4 जानेवारीला मध्यरात्री अवकाळी पाऊस पडल्यामुळे वातावरणात गारवा वाढला

मुंबई : राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबई शहरासह उपनगरातही तापमान घसरले असून रात्री आणि सकाळच्या वेळीत रस्त्यावर धुक्यांची चादर पसरलेली दिसून येत आहे. आज मुंबई आणि पुण्यासह राज्यातील इतर शहरात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कुलाब केंद्रात 27.5 अंश सेल्सिअस, तर सांताक्रुझ केंद्रात 31 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वसई-विरारमध्ये 20 अंश सेल्सिअस कमाल तापमनाची नोंद केली आहे. आज दक्षिण कोकणातील काही भागात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जितेंद्र आव्हाड-रोहित पवारांच्या प्रश्नावर Ajit Pawar म्हणाले; “खपल्या काढायच्या नाही”

कोल्हापूर-सांगलीत अवकाळी पाऊस

कोल्हापूर आणि सांगलीमध्ये काल (4 जानेवारी) मध्यरात्री अवकाळी पाऊस पडला. यामुळे वातावरण गारवा वाढला  पावसामुळे पुन्हा द्राक्ष पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या दोन दिवसात कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच रायगडमध्ये रविवारी हलक्या सरी पसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Electricity : भारतीयांच्या घरातील विजेच्या ‘दिव्यांना’ नेपाळची साथ; पुढील दहा वर्षे…

‘या’मुळे राज्यात पाऊस पडण्याची शक्यता

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र निवळले असून लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. यापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. उत्तर कर्नाटकपासून उत्तर प्रदेशपर्यंत चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -