बॉलीवूडच्या अभिनेत्यांना हॉलीवूडची क्रेझ नसलेले अगदी हातांच्या बोटांवर मोजण्याइतके असतील. पण गेल्या काही वर्षांमध्ये हिंदी सिनेमा बदलला आहे. परदेशी कलाकांराना आधी बॉलीवूडच्या गाण्यांची क्रेझ होती. पण आता सिनेमांमध्येही त्यांची रुची वाढते. त्यामुळे आता बॉलीवूड -हॉलीवूडबरोबरच अन्य देशातही कलाकार काम करताना दिसत आहेत. आता यात खिलाडी अक्षय कुमारची भर पडणार आहे. अक्षय नेमकं कायं करणार आहे याची उत्सुकता तुम्हाला असेल.
टॉयलेट… जातोय चीनमध्ये
जहा सोच वहा शौचालय! या थीमवर आधारीत अक्षय कुमारचा टॉयलेट: एक प्रेमकथा हा सिनेमा गेल्यावर्षी ११ ऑगस्टला रिलीज झाला . या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. उघड्यावर शौचाला न बसता त्याऐवजी घरोघरी शौचालये बांधा असा संदेश या सिनेमातून देण्यात आला. या सिनेमात भूमी पेडणेकर आणि अक्षय कुमारची ही प्रेमकथा ‘टॉयलेट’ भोवती फिरताना दिसली. सिनेमातील प्रेमकथा एका सामाजिक विषयाशी निगडीत असल्याने त्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आणि आता हा सिनेमा चीनमध्ये जाण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या ८ जूनला तब्बल ४ हजारहून अधिक स्र्किनवर हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
असं आहे ‘टॉयलेट….’चं पोस्टर
चीनमध्ये हा सिनेमा येत्या शुक्रवारी रिलीज होतोय. चीनसाठी याचं एक खास पोस्टर तयार करण्यात आलं आहे. स्वत: अक्षय कुमारने या पोस्टरसह सिनेमा चीनमध्ये प्रदर्शित होतोय ही बातमी दिली आहे. तर चीनी सबटायटलमध्ये या सिनेमाचा ट्रेलर देखील लाँच करण्यात आला आहे.
Delighted that our film #ToiletEkPremKatha is continuing to break new grounds and is all set to release as “Toilet Hero” across 4300 screens in China on 8th June. 电影院见!@psbhumi @ToiletTheFilm @RelianceEnt pic.twitter.com/HVUHEyf1sk
— Akshay Kumar (@akshaykumar) June 6, 2018
दंगलचीही चंगळ
टॉयलेट…च्या आधी आमीरचा दंगल हा सिनेमा देखील चीनमध्ये रिलीज झाला होता.आणि या सिनेमाने चांगली कमाई केली होती.
(सौ. युट्युब )