घरक्राइमRam Mandir : प्राणप्रतिष्ठेचे लाइव्ह स्ट्रीमिंग, लिंकवर गेल्यास बँक खाते होईल रिकामे;...

Ram Mandir : प्राणप्रतिष्ठेचे लाइव्ह स्ट्रीमिंग, लिंकवर गेल्यास बँक खाते होईल रिकामे; अलर्ट जारी

Subscribe

अयोध्या : राम मंदिरचा लोकार्पण सोहळा उद्या (सोमवार 22 जानेवारी) पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी आता फक्त अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे देशात उत्सवाचे वातावरण आहे, मात्र सायबर गुन्हेगार तुमच्या आनंदाचा बेरंग करण्याच्या तयारीत आहेत. सायबर ठग सक्रिय झाले असून ते राम मंदिर प्राण प्रतिष्ठेची लाईव्ह स्ट्रीमिंग पाठवून फसवणूक करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सरकारकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Ayodhya Ram Mandir Live streaming of Pran Pratistha link will empty bank account Alert issued)

हेही वाचा – Mohan Bhagwat : कटुता संपली पाहिजे, अयोध्येची पुनर्बांधणी ही…; मोहन भागवत यांचे आवाहन

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगार राम मंदिर प्राण प्रतिष्ठाच्या लाइव्ह स्ट्रीमिंगच्या नावाने मेसेज पाठवू शकतात. या मेसेजमध्ये एक लिंक असेल, ज्यात दावा असेल की, तुम्ही रामलल्लाचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. याचपार्श्वभूमीवर एमएचएच्या सायबर शाखेने अलर्ट जारी केला आहे. सायबर शाखेला अनेक बनावट लिंकबद्दल माहिती मिळाली. यानुसार, सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्याासठी व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवत आहेत.

बँक खाते होईल रिकामे

अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा सोमवारी पार पडणार आहे. त्यामुळे रामभक्तांनी सायबर गुन्हेगारांच्या लाइव्ह स्ट्रीमिंगच्या लिंकवर क्लिक केल्यास त्यांच्या मोबाईलमधील संवेदनशील डेटा चोरीला जाऊ शकतो किंवा बँक खाते रिकामे होऊ शकते. अशावेळी लाईव्ह स्ट्रीमिंगसंदर्भात मेसेज आल्यास सावधगिरी बाळण्याची गरज आहे. वापकर्त्यांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. तसेच ती लिंक लगेच डिलीट करावी. याशिवाय अशाप्रकारची लिंक कोणाच्या मोबाइलमध्ये आल्यास किंवा फसवणूक झाल्यास सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 वर कॉल करून तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Ayodhya : राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी; तरुणाने स्वत:ला दाऊद टोळीचा सदस्य केले घोषित

भगवान श्रीरामाच्या स्वागतासाठी अयोध्या सज्ज

या काळात पंतप्रधान मोदी स्वतः अयोध्येत उपस्थित राहणार आहेत. या भव्य राम मंदिर सोहळ्यासाठी मंदिर ट्रस्टने 7,000 हून अधिक प्रतिष्ठित लोकांना आमंत्रित केले आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा समावेश आहे. मंदिरातील भव्य सोहळ्यासाठी अयोध्या नगरी एखाद्या नववधूसारखी सजवण्यात आली आहे, जी आपल्या प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी आतूर आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला पीएम मोदी मुख्य यजमान असतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -