घरदेश-विदेशAgusta Westland प्रकरणात काँग्रेसची डोकेदुखी वाढली

Agusta Westland प्रकरणात काँग्रेसची डोकेदुखी वाढली

Subscribe

मिशेल यांनी २८ ऑगस्ट २००९ साली ही चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीनुसार वेस्टलँड प्रकरणातील इत्यंभूत माहिती त्याला पंतप्रधान कार्यालय, संरक्षण मंत्रालय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळत होती.

अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात प्रकरणी एक नवा खुलासा समोर आला आहे. या नव्या खुलास्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणात दलाली दिल्याचा आरोप असलेला ब्रिटीश नागरीक ख्रिश्चियन मिशेल यांच्याकडे एक चिठ्ठी सापडली आहे. यात त्यांनी सत्ताधारी पक्षाचा पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर दबाव होता. शिवाय या करारासंदर्भातील सर्व माहिती संबधित मंत्रालयाकडून मिळत असल्याचेही या चिठ्ठीतून समोर आले आहे.

विद्यावेतनासाठी निवासी डॉक्टरांचा काळ्या फिती लावून निषेध!

२००९ सालातील चिठ्ठी

मिशेल यांनी २८ ऑगस्ट २००९ साली ही चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीनुसार वेस्टलँड प्रकरणातील इत्यंभूत माहिती त्याला पंतप्रधान कार्यालय, संरक्षण मंत्रालय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळत होती. शिवाय तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यावेळच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्या भेटीसंदर्भातही त्याला माहिती होती. त्याने ही चिठ्ठी जुसेपी ओरसी यांना लिहिलेल्या चिठ्ठीत मिशेलने त्यावेळी या करारांसदर्भात होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीसंदर्भात माहिती असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात पंतप्रधान, डिफेन्स सेक्रेटरी आणि जॉईंट सेक्रेटरी यांच्यामध्ये जी चर्चा सुरु होती. याची देखील मिशेलला माहिती होती. त्यावेळचे संरक्षणमंत्री या कराराच्या बाजूने असल्याचे त्याने या चिठ्ठीत नमूद केले होते. त्यामुळे साहजिकच यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे.

- Advertisement -
‘MI नोट ५’ चा स्फोट; पती -पत्नी जखमी

काय आहे अगुस्ता वेस्टलँड प्रकरण?

अगुस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहार प्रकरणात ब्रिटीश नागरिक ख्रिश्चियन मिशेल याचे ४ डिसेंबर रोजी भारताला प्रत्यार्पण करण्यात आले. हेलिकॉप्टरच्या व्यवहार प्रकरणाच्या तपासासाठी तो तपास संस्थाना हवा होता. तब्बल ३हजार ६०० कोटींचा हा घोटाळा होता. गेल्याच महिन्यात मिशेलच्या प्रत्यापर्णाची परवानगी देण्यात आली. ईडीने मिशेलविरोधात जून २०१६ मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. यात त्याने या खरेदी प्रकरणात २२५ कोटी रुपये इतकी मोठी रक्कम लाच घेतली असल्याचा आरोप करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -