घरदेश-विदेशएम्सच्या डॉक्टरांचा दावा! कोरोनावर नियंत्रण मिळवणं शक्य, सापडली नवी उपचार पद्धत!

एम्सच्या डॉक्टरांचा दावा! कोरोनावर नियंत्रण मिळवणं शक्य, सापडली नवी उपचार पद्धत!

Subscribe

ऑक्सिजन आधारावर ठेवलेल्या दोन कोविड -१९ रुग्णांना गेल्या शनिवारी थेरपी देण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. लस तसेच अनेक प्रकारचे प्रयोगही सुरु आहेत. प्लाझ्मा थेरेपी तसेच आयुर्वेदिक पद्धतीने औषधाचा शोध घेण्यात येत आहे. राजधानी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने (एम्स) कोरोना व्हायरस-संक्रमित रूग्णांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे कमी करण्यासह कोरोनोचा संसर्ग रोखण्यासाठी नवीन प्रयोग केला जात आहे. यासाठी रेडिएशन थेरपीचा वापर करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.

एम्समधील रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख आणि शोध प्रकल्प प्रमुख डॉ. डीएन शर्मा यांनी सांगितले की, ऑक्सिजन आधारावर ठेवलेल्या दोन कोविड -१९ रुग्णांना गेल्या शनिवारी थेरपी देण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली आहे.

- Advertisement -

एम्समधील सेंटर येथे असलेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झालेल्या ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांना ऑक्सिजनचा आधार आता काढण्यात आला आहे. तसेच, कर्करोगाचा उपचार करण्यासाठी बहुधा रेडिएशन थेरपीचा वापर उच्च डोसमध्ये केला जातो. परंतु या प्रकरणात, आम्ही एकाच वेळी रुग्णाला ७०  सेंटीग्रेड रेडिएशन सुरक्षित प्रमाणात देत आहोत. संपूर्ण उपचारात सुमारे १५ ते २० मिनिटे लागतात आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, असे देखील डॉ शर्मा यांनी सांगितले.

डॉ. शर्मा म्हणाले की, अँटीबायोटिक्स उपलब्ध नसतात तेव्हा रेडिएशन थेरपी फक्त १९४० च्या दशकात न्यूमोनियाच्या उपचारात वापरली जात होती. आता पायलट प्रोजेक्टचा एक भाग म्हणून ८ कोरोना रुग्णांवर रेडिएशन थेरपीद्वारे उपचार केले जात आहे. रेडिएशन थेरेपीद्वारा उपचार करण्यात आलेल्या रुग्णामध्ये या उपचारानंतर काय परिणाम जाणवले, याचा एम्सचे वैद्यकीय चिकित्सक अभ्यास करणार आहे. प्रायोगिक प्रकल्प असल्यामुळे यांचा परिणाम देशातील कोरोना उपचार पद्धतीवर होणार आहे.


दिल्लीत ‘Rapid Antigen Test’ ने कोरोना चाचणी सुरू; १५ मिनिटांत येणार रिपोर्ट!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -