घरदेश-विदेशएअर इंडियाचे विमान उडवून देण्याची धमकी; लंडनमध्ये एमर्जन्सी लँडिंग

एअर इंडियाचे विमान उडवून देण्याची धमकी; लंडनमध्ये एमर्जन्सी लँडिंग

Subscribe

ब्रिटिश फायटर विमानाच्या सुरक्षेमध्ये एअर इंडियाच्या या विमानाला स्टॅनस्टेड विमानतळावर सुरक्षितरित्या उतरवण्यात आले.

एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आल्याने लंडन विमानतळावर विमानाचे एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हे विमान मुंबईवरुन नेवार्कला जात होते. नेवार्कला जाणारे हे विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली होती. त्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर लँडिंग करण्यात आले.

- Advertisement -

एअर इंडियाची बी ७७७ फ्लाइट ए- १९१ या विमानाने मुंबईवरुन अमेरिकाच्या नेवार्कला जाण्यासाठी उड्डाण घेतले. मात्र या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. अमेरिकेच्या सुरक्षा मंत्रालयाने सांगितले की, ब्रिटिश फायटर विमानाच्या सुरक्षेमध्ये एअर इंडियाच्या या विमानाला स्टॅनस्टेड विमानतळावर सुरक्षितरित्या उतरवण्यात आले. ट्विटनुसार, गुरुवारी सकाळी विमान उडवण्याची धमकी देण्यात आल्यानंतर विमानाचा मार्ग लंडनकडे वळवण्यात आला. त्यानंतर या विमानाला स्टॅनस्टेड विमानतळावर एसेक्स पोलिसांच्या नियंत्रणाखाली सकाळी १०.१५ मिनिटाने उतरवण्यात आले. दरम्यान, तपासानंतर विमानात बॉम्ब सापडला नाही. त्यानंतर विमान पुन्हा नेवार्कासाठी रवाना करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

- Advertisement -

स्टॅनस्टेड विमानतळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, या विमानाच्या एमर्जन्सी लँडिंगमुळे मुख्य विमानसेवेवर काहीच परिणाम झाला नाही. एअर इंडियाने देखील आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट करत विमानाचे एमर्जन्सि लँडिंग करत असल्याची माहिती दिली होती. मात्र काही वेळानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले.

हेही वाचा – 

संकटात सापडलेल्या एअर इंडियाचं कर्मचाऱ्यांना नवं फर्मान!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -