घरक्राइमAyodhya : राम मंदिर सोहळ्यादरम्यान सायबर ठगही सक्रिय; व्हीआयपी पासाच्या आमीषाने बँक...

Ayodhya : राम मंदिर सोहळ्यादरम्यान सायबर ठगही सक्रिय; व्हीआयपी पासाच्या आमीषाने बँक खाते होणार रिकामे

Subscribe

अयोध्या : लोकांची फसवणूक करून आपला फायदा करण्यासाठी आरोपी दररोज नवनवीन पद्धत अवलंबत असतात. येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. याचपार्श्वभूमीवर आता आरोपींनी लोकांची फसवणूक करण्यासाठी रामलल्लाच्या नावाची मदत घेतली आहे. रामलल्लाच्या लोकार्पणाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतशी देशभारात उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र आता अनेक फसवणुकीचे प्रकारही समोर येत आहे. अनेक भाविकांना व्हॉट्सअॅपवर फ्रॉड मेसेज येत आहेत. त्यामुळे फरीदाबाद पोलिसांना सायबर सुरक्षेशी संबंधित सूचना जारी केल्या आहेत. तसेच सोशल मीडियावर दिसणार्‍या कोणत्याही प्रकारच्या लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन पोलिसांनी सामान्य जनतेला केले आहे. (Ayodhya Cyber thugs also active during Ram temple celebrations The lure of the VIP pass will empty the bank account)

पोलीस प्रवक्ते सुबे सिंह यांनी सांगितले की, राम मंदिराच्या उद्घाटनासंदर्भात मोठ्या प्रमाणात सायबर ठगही सक्रिय होत आहेत. उद्घाटनासाठी बनावट निमंत्रणपत्रे पाठवून ते लोकांची फसवणूक करू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे. लोक व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया अकाउंटवर एपीके फाइल्स पाठवत आहेत. त्यात राम मंदिराच्या उद्घाटनासाठी व्हीआयपी पास मिळवा, या आशयाचा मजकूर आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Modi – Pawar Visit Solapur : एकाच दिवशी दोन मोठे नेते सोलापुरात; राजकीय वातावरण तापणार?

सुबे सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांना पाठवण्यात येणारी एपीके फाइलमध्ये एक मालवेअर आहे. या फाइलवर क्लिक केल्यानंतर फसवणूक करणारे लोक नागरिकांचे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण रिमोटवर घेऊन त्यांची फसवणूक करू शकतात. ते नारिकांचा डेटा चोरू शकतात आणि खंडणी वगैरे मागू शकतात. त्यामुळे राम मंदिर लोकार्पण कार्यक्रमासाठी येणाऱ्या व्हिआयपी पासकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त राकेश कुमार आर्य यांनी केले आहे. तसेच पाठवल्या जाणार्‍या एपीके फाइलवर क्लिक करू नका आणि ती लगेच डिलीट करू नका, असेही त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

सहा दिवसांत 11 जणांना अटक

सुबे सिंह यांनी सांगितले की, फरीदाबाद पोलिसांनी सहा दिवसांत 11 फसवणूक करणाऱ्यांना अटक केली असून फसवणुकीच्या सात प्रकरणांचा पर्दाफाश केला आहे. या आरोपींना 5 ते 11 जानेवारी दरम्यान विविध ठिकाणांहून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय सायबर पोलीस स्टेशन सेंट्रलचे तीन, सायबर पोलीस स्टेशन बल्लभगढचे तीन आणि सायबर पोलीस स्टेशन एनआयटीचे एक प्रकरण सोडवण्यात आले आहे.

हेही वाचा – Ayodhya : सर्व हॉटेल्स 100 टक्के बुक, 170 किलोमीटर अंतरातील रुमचे भाडे गगनाला भिडले

फसवणूक झाल्यास संपर्क साधण्याचे आव्हान

गेल्या काही दिवसांत पोलीस ठाण्यात आलेल्या सुमारे 170 तक्रारींचा निपटारा करताना फसवणूक करणाऱ्यांच्या बँक खात्यातून सुमारे 40.30 लाख रुपये परत करण्यात आले. फसवणूक करणाऱ्यांची 617 सिमकार्डही ब्लॉक करण्यात आली आहेत. याचपार्श्वभूमीवर फरीदाबाद पोलिसांनी सायबर गुन्ह्याच्या बाबतीत सायबर हेल्पलाइन 1930 किंवा https//cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा असे आव्हान केले आहे. तसेच कोणत्याही संस्थेला सायबर जनजागृतीशी संबंधित कार्यक्रम/प्रशिक्षण घ्यायचे असेल तर सहाय्यक पोलीस आयुक्त सायबर यांच्याशी 9991252353 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -