घरदेश-विदेशPatanjali : बाबा रामदेव यांच्या कंपनीने नाव बदलण्याचा घेतला निर्णय

Patanjali : बाबा रामदेव यांच्या कंपनीने नाव बदलण्याचा घेतला निर्णय

Subscribe

बाबा रामदेव यांच्या कंपनीने नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. बाबा रामदेव यांच्या मालकीची रुची सोया या कंपनीच्या बोर्डाने कंपनीचे नाव बदलण्यास मान्यता दिली आहे. आता रुची सोयाचे नाव बदलून पतंजली फूड्स लिमिटेड करण्यात येणार आहे. रुची सोया बोर्डाची १० एप्रिल रोजी एक महत्त्वाची बैठक झाली, ज्यामध्ये नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. कंपनीकडून असेही सांगण्यात आले की रुची सोया आता पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीसोबत अधिक समन्वयाने काम करण्याच्या दिशेने वाटचाल करेल. दरम्यान, बाबा रामदेव यांची कंपनी रुची सोया सध्या शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या रडारवर आहे.

नुकताच रुची सोयाचा एफपीओ आला. ४ हजार ३०० कोटींचा हा FPO खूप यशस्वी झाला. ३.६ पट सबस्क्रिप्शन मिळाले. कंपनीने FPO अंतर्गत ४.८९ कोटी शेअर्स जारी केले होते, ज्याच्या बदल्यात १७.५६ कोटी शेअर्सच्या बोली प्राप्त झाल्या होत्या. रिटेलबद्दल बोलायचे तर, FPO मध्ये यासाठी ३५टक्के सुरक्षितता होती. रिटेल सेगमेंटमध्ये ९० टक्के सबस्क्रिप्शन मिळाले.

- Advertisement -

हा FPO २४ मार्च रोजी उघडला गेला आणि प्राईस बँड रु. ६१५-६५० दरम्यान ठेवण्यात आला. कंपनीने गुंतवणूकदारांकडून १२९० कोटी रुपये उभे केले होते. रुची सोया इंडस्ट्रीज, बाबा रामदेव यांच्या मालकीच्या पतंजली आयुर्वेदचे युनिट, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या किमान २५ टक्के सार्वजनिक शेअरहोल्डिंग मानदंड पूर्ण करण्यासाठी FPO बाजारत आणला होता. पतंजलीने २०१९ मध्ये रुची सोयाला दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत ४,३५० कोटी रुपयांना विकत घेतले होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -