घरदेश-विदेश२०१९ मध्ये आम्हीच बहुमताने जिंकू - अमित शहा

२०१९ मध्ये आम्हीच बहुमताने जिंकू – अमित शहा

Subscribe

२०१९ मध्ये भाजप बहुमताने जिंकेल आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असा अंदाज भाजपचे राष्ट्रिय अध्यक्ष अमित शहा म्हणाले आहेत.

२०१९ मध्ये आम्ही बहुमताने जिंकू असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले आहेत. ‘आजतक’ या वृतवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ‘मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील’, असे अमित शहा म्हणाले आहेत. यासोबतच उत्तर प्रदेशमध्ये भाजप ७३ ते ७४ जागांवर विजय मिळवेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. यावेळी अमित शहा यांनी विरोधकांवरही टीका केली. समाजवादी आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आल्याने आम्हाला काहीच फरक पडणार नाही.

‘काँग्रेसला आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही’

अमित शहा यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. यावेळी ते म्हणाले की, ज्यांनी आणीबाणी आणली, त्यांना आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. त्याचबरोबर प्रियंका या गेल्या १२ वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत, असे शहा म्हणाले. यावेळी अमित शहा म्हणाले की, आमच्यामुळे २२ कोटी लोकांच्या आयुष्यात बदल झाला. अडीच कोटी लोकांच्या घरात आम्ही वीज पोहोचवली.

- Advertisement -

‘कोणत्याही संस्थेत भाजपचा हस्तक्षेप नाही’

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संदर्भात जेव्हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा अमित शहा यांनी केंद्र सरकारला सल्ला देण्याचा अधिकार आहे, असं म्हटलं आहे. अमित शहा म्हणाले की, ‘कोणत्याही संस्थेत भाजपने मध्यस्थी केलेली नाही. कोणतीही संस्था देशापेक्षा मोठी असू शकत नाही. मात्र, केंद्र सरकारला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सल्ला देण्याचा अधिकार आहे. संसदेत उत्तर सरकारला द्यायचं असतं.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -