घरदेश-विदेशभाजपविरोधातील वक्तव्ये अंगलट! सत्यपाल मलिक यांची सीबीआय चौकशी

भाजपविरोधातील वक्तव्ये अंगलट! सत्यपाल मलिक यांची सीबीआय चौकशी

Subscribe

मेघालयचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात सीबीआयकडून चौकशी करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असताना त्यांना 23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 या कालावधीत दोन फाईल्स क्लिअर करण्यासाठी 300 कोटींची लाच देऊ केल्याचा आरोप त्यांनी केला होता. सत्यपाल मलिक यांच्या या आरोपांच्या आधारे एप्रिलमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दोन भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. सीबीआयने या प्रकरणांच्या तपासाअंतर्गत ही चौकशी केली आहे.

मेघालयसह इतर अनेक राज्यांचे राज्यपाल राहिलेले मलिक अनेक दिवसांपासून चर्चेत होते. शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांनी केलेल्या व्यक्तव्यांमुळे केंद्र सरकार अडचणीत सापडले होते. यात जम्मू काश्मीरचे राज्यपाल असताना आपल्याला 300 कोटी रुपयांची लाच देऊ केल्याचा दावा त्यांनी केला होता. यानंतर सीबीआयने या आरोपांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

समोर आलेल्या माहितीनुसार, सीबीआयने मलिक यांना दिल्लीतील सीबीआय कार्यालयात बोलावून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आहे. दरम्यान सत्यपाल मलिक गेल्यावर्षी 17 ऑक्टोबर रोजी झुंझुनू येथील एका कार्यक्रमात म्हणाले होते की, माझ्यासमोर दोन फाईल आल्या होत्या, एका सचिवांनी मला सांगितले की, या फायली क्लिअर करण्यासाठी तुम्हाला 150 कोटी रुपये मिळतील, पण मी त्यांना सांगितले की, मी काश्मीरमध्ये येताना पाच कुर्ता पायजमा आणले आहे आणि त्यांच्यासोबतच परत जाईन. असे सांगत मी ऑफर नाकारली. यावर्षी एप्रिलमध्ये सीबीआयने मलिक यांच्या आरोपांसंदर्भात दोन एफआयआर नोंदवले होते. यासोबतच मलिक यांनी हे दोन्ही गुन्हे रद्द केल्याचेही सांगितले होते.

सत्यपाल मलिक राज्यपाल म्हणून या महिन्यात निवृत्त झाले. त्यांचा कार्यकाळ 3 ऑक्टोबर रोजी संपला त्यानंतर त्यांना मुदतवाढ देण्यात आली नाही. आता त्यांच्या जागी बी.डी. मिश्रा मेघालयचे राज्यपाल म्हणून शपथ घेतील.


प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामुळे राज्याच्या नावलौकीकात भर, मुख्यमंत्र्यांकडून गौरवोद्गार


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -