घरट्रेंडिंगगावात राहून करता येणार कमाई! सरकारच्या 'या' योजनेचा घ्या लाभ; जाणून घ्या...

गावात राहून करता येणार कमाई! सरकारच्या ‘या’ योजनेचा घ्या लाभ; जाणून घ्या नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया

Subscribe

कोरोना महामारी दरम्यान, लाखो लोक एका शहरातून दुसर्‍या गावात स्थलांतरित झाले आहेत. काहींनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे तर काही सेंद्रिय भाजीपाला लागवड करीत आपला रोजगार सुरू ठेवला. तुमच्यापैकी बरेच जण गावात राहून पैसे कमाविण्याचा मार्ग शोधत असाल तरी ही बातमी नक्की वाचा. तुम्ही सुशिक्षित असाल आणि तुम्हाला तुमच्या गावी राहूनच काही करायचे असेल तर सरकारची ही योजना तुमच्यासाठी नक्की फायदेशीर ठरू शकते. सरकारच्या या योजनेंतर्गत तुम्हाला चांगले पैसे कमवता येऊ शकतात. सरकारची ही योजना डिजिटल इंडिया अंतर्गत येते आणि त्यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन प्रशिक्षणही देण्यात येणार येते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या गावातून किंवा घरातून काम सुरू करू शकतात. जाणून घ्या सविस्तर ….

जाणून घ्या नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया

सरकारच्या डिजिटल इंडिया अंतर्गत तुम्ही तुमच्या गावात कॉमन सर्व्हिस सेंटर (Common Service Center) उघडून तुमचे उत्पन्न मिळवू शकता. ग्रामीण युवकांना उद्योजक बनविणे आणि डिजिटल इंडियाचा लाभ प्रत्येक गावात पोहोचविणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. जर तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर उघडण्यास तयार असाल आणि कंम्प्युटर कसे चालवायचे याचे तुम्हाला ज्ञान असेल तर सर्वप्रथम कॉमन सर्व्हिस सेंटरसाठी रजिस्टर करा. नोंदणीच्या वेळी तुम्हाला 1,400 रुपये भरणं आवश्यक असणार आहे.

- Advertisement -

नोंदणी दरम्यान, तुम्हाला ज्या ठिकाणी केंद्र उघडायचे आहे, त्याचा फोटो देखील अपलोड करावा लागणार आहे. फॉर्म भरल्यानंतर, तुम्हाला एक आयडी मिळेल ज्यामधून तुम्ही तुमचा अर्ज ट्रॅक करू शकाल. अर्ज स्वीकारल्यानंतर तुमचे प्रशिक्षण घेण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल. प्रमाणपत्रासह, तुम्हाला बर्‍याच सेवांची परवानगी मिळेल ज्या सामान्य सायबर कॅफे चालवणाऱ्या व्यक्तीला मिळत नाहीत.

.तुमच्या केंद्रात तुम्ही ऑनलाईन अभ्यासक्रम, सीएससी मार्केट, कृषी सेवा, ई कॉमर्स विक्री, रेल्वे तिकिटे, विमान व बसची तिकिटे तसेच मोबाइल व डीटीएच रिचार्ज करू शकतात. याशिवाय तुम्ही पासपोर्ट बनविण्यापासून पॅनकार्ड बनविण्यासह अनेक सरकारी कामे करू शकाल. या कामांसाठी सरकार तुमच्याकडून पैसे घेणार नाही. तुम्ही तुमच्या गाव-शहरानुसार कोणत्याही कामाची किंमत ठरवू शकतात.


जगात कोरोना महामारीची धोकादायक स्थिती; जगातील मृतांची संख्या 40 लाखांच्या पार – WHO

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -