घरदेश-विदेशअंत्यविधीनंतर देखील 'तो' झाला 'जिवंत'

अंत्यविधीनंतर देखील ‘तो’ झाला ‘जिवंत’

Subscribe

४९ वर्षाची व्यक्ती जिवंत झाल्याची घटना केरळमध्ये घडली आहे. अंत्यसंस्कारानंतर झालेल्या या घटनेनं सारेच चक्रावले आहेत.

मरणानंतर माणूस कधी जिवंत झाल्याचं तुम्ही पाहिलं आहे? किंवा ऐकलं आहे? पण प्रत्यक्षात केरळमध्ये ही घटना घडली आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? मेलेला माणूस पुन्हा जिवंत होतो का? काय पण सांगता राव. असं काहीही मत बनवण्यापूर्वी थोडं थांबा. त्याचं झालं असं की, केरळमधल्या वायनाड येथील ४९ वर्षीय साजी घर सोडून निघून गेले होते. घरच्यांनी साजीचा शोध घेण्यासाठी आकाशपातळ एक केले. शक्य तेवढा सर्वत्र शोध घेतला. साजीच्या शोधासाठी मैलोनमैल पायपीट केली. पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. पण, साजी काही सापडला नाही. कुटुंबिय हताश झाले. काय कळेना हेच त्यांना कळेना. साजीच्या घरी परतण्याकडे प्रत्येकाचं लक्ष लागून राहिलं होतं. आज येईल,उद्या येईल असं म्हणत प्रत्येक जण त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. पण सारं व्यर्थ होतं. साजी काही आला नाही. नशीबापुढं साऱ्यांनी हात टेकले. साऱ्यांनी काळापुढं शरणागती पत्करली. आणि अचानक एक दु:खद बातमी येऊन धडकली. ती साजीचा मृतदेह सापडल्याची. कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. ज्या साजीच्या येण्याकडे सर्वांचे डोळे लागले होते त्या साजीचा मृतदेह ताब्यात घेण्याची वेळ कुटुंबियांवर आली होती. अत्यंत जड अंतकरणानं मनावर दगड ठेवून कुटुंबियांनी साजीचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याच्यावर अंत्यसंस्कार देखील केले. अन् अचानक एक दिवस साजी घरी आला. हा नक्की काय चमत्कार आहे हे कुणालाच कळेना. पण, त्याचं झालं असं की, ज्या मृतदेहावर साजीच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले होते तो मृतदेह साजीचा नव्हताच. केवळ कुटुंबियांनी केलेल्या वर्णनावरून एक अज्ञात मृतदेह पोलिसांनी साजीच्या कुटुंबियांकडे सोपवला होता. पण साजी मात्र जिवंत होता आणि सुखरूपही. त्यामुळे घरचे देखील सुखावले. समाधान होतं साजी जिवंत असल्याचं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -