घरदेश-विदेशप्रवाशाचे सामान उतरवण्यासाठी विमान पुन्हा गेले पार्किंगमध्ये

प्रवाशाचे सामान उतरवण्यासाठी विमान पुन्हा गेले पार्किंगमध्ये

Subscribe

विमानाला रन- वेवरुन उड्डाण करण्यासाठी मिळालेला वेळ चुकल्यामुळे पुन्हा रिकामा रन वे मिळेपर्यंत उशीर झाल आणि विमानाच्या उड्डाणाला तब्बल तासभर उशीर झाला.

विमान प्रवासात अनेकदा असं काही होतं की, विमानातील क्रू मेंबर्सचाही नाईलाज असतो. अशीच एक घटना हैदराबादमध्ये घडली आहे. विमानाचे उड्डाण उशीरा झाले याचे कारण ऐकाल तर तुम्ही डोक्याला हात मारुन घ्याल. केवळ प्रवाशाचे सामान विमानात राहिले म्हणून ते परत देण्यासाठी विमान रनवेवरुन पार्किंगमध्ये परतले. हा सगळा प्रताप करेपर्यंत विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला.जाणून घ्या ही सगळी घटना…

मोदीचं मिशन २०१९; परदेश दौरे नाहीत

नेमकं प्रकरण काय?

हैदराबादवरुन दिल्लीसाठी उड्डाण घेण्यासाठी इंडिगोचे विमान तयार होते. सकाळी ४ वाजून ३५ मिनिटांनी हे विमान निघणार होते. इंडिगोच्या विमानात १७५ प्रवासी बसलेले होते. विमान प्रवाशांना घेऊन रनवेवर निघाले. तेवढ्यात विमानाला परत पार्किंगमध्ये बोलावण्यात आले. फक्त एका प्रवाशाचे सामान परत करण्यासाठी सहप्रवाशांना काहीच कळत नव्हते. पण नंतर इंडिगोकडून अशी माहिती देण्यात आली की, या विमानात प्रवास करणारा एक प्रवासी चढलाच नव्हता पण त्याचे सामान विमानात आधीच लोड करण्यात आले होते. पण तो बोर्डिंगच्यावेळी विमानात पोहोचलाच नाही.त्यामुळे त्याचे सामान परत करण्यासाठी विमान पुन्हा पार्किंगमध्ये आले.

- Advertisement -
पॉर्न बघताय? सावधान! तुमचा डेटा होतोय चोरी

रनवे मिळण्यासाठी झाला उशीर

विमानाला रन- वेवरुन उड्डाण करण्यासाठी मिळालेला वेळ चुकल्यामुळे पुन्हा रिकामा रन वे मिळेपर्यंत उशीर झाल आणि विमानाच्या उड्डाणाला तब्बल तासभर उशीर झाला. या प्रवाशाला विमानात चढू दिले नाहीच पण त्याची बॅग देण्यासाठी नाहक उशीर झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -