घरदेश-विदेशहरयाणाचे मनोहर लाल खट्टर दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

हरयाणाचे मनोहर लाल खट्टर दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

Subscribe

जननायक जनता पार्टी (जेजेपी) नेते दुष्यंत चौटाला हे राज्याचे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

हरयाणामध्ये नवीन सरकार स्थापन होणार असून मनोहर लाल खट्टर हे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची आज शपथ घेणार आहे. तर जननायक जनता पार्टी (जेजेपी) नेते दुष्यंत चौटाला हे राज्याचे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. शनिवारी एकमताने भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून मनोहर लाल खट्टर यांची एकमताने निवड करण्यात आली होती. हा शपथविधी सोहळा दुपारी अडीच वाजता चंदीगडच्या राजभवनात पार पडणार आहे.

उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ 

भारतीय जनता पार्टी आणि जेजेपी यांच्यात शुक्रवारी हरियाणाचे पुढील सरकार स्थापन करण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी घेण्यात आली होती. यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला बहुमत मिळण्यास ५ ते ६ जागा हव्या होत्या. या झालेल्या करारानुसार मुख्यमंत्री भाजपचा असणार असेल तर उपमुख्यमंत्रीपद जेजेपीला देण्यात येईल, असे निश्चित करण्यात आले. त्यामुळे या कराराअंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला हे देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

- Advertisement -

हे नेते शपथविधी सोहळ्यात असतील उपस्थित

शुक्रवारी रात्री दिल्लीत अमित शहा यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषद घेत दुष्यंत चौटाला यांनी हरियाणामध्ये भाजपाला पाठिंबा देऊन युतीची घोषणा केली. मात्र शपथविधीच्या पूर्वी हे निश्चित नाही की, या नव्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात कोण-कोण समाविष्ट असतील. हरियाणात मनोहर लाल खट्टर यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -