घरदेश-विदेशभारतात आल्यास जमावाकडून हत्या - नीरव मोदी

भारतात आल्यास जमावाकडून हत्या – नीरव मोदी

Subscribe

बँकेचे कर्ज बुडवून परदेशात पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी ईडीशी ईमेलद्वारे संपर्क साधला आहे. या ईमेलद्वारे त्याने भारतात न येण्याचे कारण स्पष्ट केले आहे. मी भारतात आलो तर माझ्यासोबत मॉब लिंचिंग होऊ शकतो, अशी भीती त्याने व्यक्त केली आहे. नीरव मोदीने ईमेलमध्ये म्हटले आहे की, मी कर्मचाऱ्यांना पगार दिलेला नाही, दुकान आणि कार्यालयाचे भाडे दिलेले नाही, सीबीआयने आमच्या ग्राहकांचे दागिने दुकानातून जप्त केलेले आहेत आणि इतर काही व्यावसायिक वाद आहेत. या सर्व लोकांकडून माझ्या जीवाला धोका असल्याचे त्याचे म्हणणे आहे.

नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेचे १३ हजार ६०० कोटी रुपये बुडवलेले असून सध्या तो परदेशात लपलेला आहे. मोदीचा ठावठिकाणा अद्याप कुणालाही कळलेला नाही. तसेच मोदीचा नातेवाईक आणि गिताजंली जेम्सचा अध्यक्ष मेहुल चोक्सी देखील पीएनबी घोटाळ्यातील एक आरोपी आहे. चोक्सीने सुद्धा भारतात मॉब लिंचिंगचा ट्रेंड असल्यामुळे भारतात येण्यास नकार दिला होता.

- Advertisement -

नीरव मोदींच्या वकिलांनी मात्र वेगळाच सुर आवळला आहे. पीएमएलए कोर्टात नीरव मोदी फरार झाला याबद्दल केस चालू आहे. नीरव मोदी फरार झाला नसून अधिकृत पासपोर्टच्या आधारेच त्यांनी देश सोडला असल्याचे नीरव मोदीचे वकिल पी. अग्रवला यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांमध्ये भारतात जमावाकडून हत्या होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. लोकांनीच कायदा हातात घेऊन एखाद्या व्यक्तीला शिक्षा देण्याची पद्धत अनेक ठिकाणी राबवली गेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -