घरदेश-विदेशचीनला टक्कर देणारा भारत एकमेव देश, जर्मनीने केले कौतुक

चीनला टक्कर देणारा भारत एकमेव देश, जर्मनीने केले कौतुक

Subscribe

नवी दिल्ली – जगात भारताशिवाय दुसरा कोणताही देश नाही, जो चीनला टक्कर देऊ शकेल, असं कौतुक जर्मनीने केलं आहे. काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेश येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन सैनिकांमध्ये जोरदार झटापट झाली. या झटापटीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले होते.

भारत-चीन हा चिंतेचा विषय आहे. आंतरराष्ट्रीय सीमांचं उल्लंघन होता कामा नये. विकासाच्या बाबतीत भारताशिवाय इतर कोणताही दुसरा देश चीनसोबत स्पर्धा करू शकत नाही, असं जर्मनीचे राजदूत फिलीप एकरमॅन यांनी एका मुलाखतीत सांगितलं. युरोपीय देशातील रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम जगावर झाला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. आर्थिक परिस्थितीही बिघडली आहे. असं असताना भारत-चीनमधील समस्या हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे विकास, लोकसंख्या आणि इतर बाबींमध्ये भारताशिवाय दुसरा कोणताही देश चीनला टक्कर देऊ शकत नाही, असं फिलीप यांनी सांगितलं.

- Advertisement -

एटीएफचा करार झाला पाहिजे. कारण यामुळे जर्मनी आणि भारतामधील व्यवसायिक संबंध सुधारू शकतील. सध्या जर्मनी चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळे अन्य देशांशी जर्मनीला व्यापार वाढवावा लागणार आहे. मात्र, भारताकडून आम्हाला अपेक्षित प्राधान्य मिळताना दिसत नाही, अशी खंतही फिलीप यांनी बोलून दाखवली.

हेही वाचा – चीनने पुन्हा कुरापत काढली तर सडेतोड उत्तर मिळेल; संरक्षण मंत्र्यांची संसदेत ग्वाही

- Advertisement -

अरुणाचलमधील तवांग येथील घटनेबाबत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत निवेदन दिले आहे. यावेळी ते म्हणाले की, “9 डिसेंबर 2022 रोजी, पीएलए जवानांनी स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने त्याचा खंबीरपणे सामना केला. यादरम्यान हाणामारीही झाली. भारतीय लष्कराने चिनी सैनिकांना अतिक्रमण करण्यापासून रोखले आणि त्यांना त्यांना परत पाठवले. यादरम्यान भारतीय सैन्याचा एकही जवान शहीद झाला नाही किंवा कोणीही जखमी झाला नाही. या घटनेनंतर, तेथील स्थानिक कमांडरने 11 डिसेंबर 2022 रोजी प्रस्थापित व्यवस्थेअंतर्गत आपल्या चिनी समकक्षासोबत ध्वज बैठक घेतली आणि घटनेवर चर्चा केली. चीनच्या बाजूने सीमेवर शांतता राखण्यास सांगितले होते. हा मुद्दा चीनच्या बाजूने राजनैतिक पातळीवरही मांडण्यात आला आहे.

हेही वाचा सैन्य संघर्षाच्या पडद्याआड चीनची वेगळी रणनीती!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -