घरदेश-विदेशIRCTC Railway Ticket : ऑनलाइन तिकीट बुक करताना 'ही' चूक केल्यास तुमचे...

IRCTC Railway Ticket : ऑनलाइन तिकीट बुक करताना ‘ही’ चूक केल्यास तुमचे बँक खाते होईल रिकामे

Subscribe

नवी दिल्ली : सध्या कुठेही फिरायला जायचे असेल तर आपण ऑनलाइन तिकीट बुक करून आपला वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतो, मात्र भारतीय रेल्वेकडून रेल्वे प्रवाशांना एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘irctcconnect.apk’ ऍप डाउनलोड करू नका. या ऍपचा वापर करताना तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.

सध्या डिजिटल युग सुरू झाल्यामुळे प्रत्येकजण ऑनलाइन ऍपचा वापर करून आपली कामे सोपी करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्यामुळे कुठे फिरायला जायचे असेल तर आपण ऑनलाइन हॉटेल बुक करतो, त्या परिसरात फिरण्यासाठी गाडी बुक करतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या ठिकाणी जाण्यासाठी आपण रेल्वेचे तिकीट बुक करतो. पण रेल्वेचे तिकीट बुक करताना आता खबरदारी घेण्याची गरज आहे. भारतीय रेल्वेकडून सर्व प्रवाशांना एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘irctcconnect.apk’ हे ऍप व्हॉट्सऍप किंवा टेलिग्रामसारख्या लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून पाठवले जाते, परंतु हे ऍप डाउनलोड करू नका. हे ऍप तुमच्या फोनसाठी धोकादायक असून ते इन्स्टॉल केल्याने तुमचा फोन खराब होऊ शकतो किंवा फोन हॅक झाल्यास तुमचे बँक खातेही रिकामे होऊ शकते, असे आयआरसीटीसीने म्हटले आहे.

- Advertisement -

आयआरसीटीसीने म्हटले आहे की, ‘irctcconnect.apk’ या ऍपद्वारे काही लोक भारतीय रेल्वेच्या नावाचा वापर करून तुमची महत्त्वाची वैयक्तिक माहिती मिळवू शकतात. त्यानंतर ते तुमचे UPI तपशील आणि इतर महत्त्वाचे बँकिंग तपशील घेऊन तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात. हा धोका टाळण्यासाठी भारतीय रेल्वेने ऍप डाउनलोड न करण्याचा सल्ला दिला आहे.

स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टी करा
‘irctcconnect.apk’ हे ऍप तुम्हाला अनोळखी व्यक्तीने किंवा तुमच्या ओळखीतल्या व्यक्तीने पाठवले असेल तर ते तुम्ही इंस्टॉल करू नका. तुम्हाला तिकीट बुक करायची असेल तर तुम्ही Google Play Store किंवा Apple Store वर जाऊन ‘IRCTC Rail Connect’ हे मूळ ऍप डाउनलोड करू शकता. ऍप डाऊनलोड करताना IRCTC कधीही ग्राहकांना पिन, ओटीपी, पासवर्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड तपशील विचारत नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -