घरदेश-विदेशIsrael-Palestine conflict : इस्रायलवरील हल्ल्याचा काँग्रेसकडून निषेध, पॅलेस्टिनी नागरिकांना दिले समर्थन

Israel-Palestine conflict : इस्रायलवरील हल्ल्याचा काँग्रेसकडून निषेध, पॅलेस्टिनी नागरिकांना दिले समर्थन

Subscribe

काँग्रेस पक्षाकडून इस्रायल-हमास युद्धाबाबतची आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. काँग्रेसने इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत या संदर्भातील एक ठराव पक्षाने आपल्या कार्यकारिणीमध्ये मंजूर केला आहे.

नवी दिलली : हमासने रॉकेट हल्ल्यानंतर जमीन, समुद्र आणि हवाई मार्गाने हमासचे सैनिक इस्रायलमध्ये घुसले आहेत. त्यांनी अनेक शहरे आणि लष्करी तळांवर घुसखोरी केली आहे. त्यांच्या सैनिकांनी इस्रायली नागरिक, सैनिक आणि परदेशी नागरिकांचे अपहरण करून त्यांना ओलीस बनवून बोगद्यात ठेवले आहे. त्यानंतर इस्रायलच्या हवाई दलानेही हमास गटाच्या ताब्यात असलेल्या गाझा सीमेवर जलद हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. जगात तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती उद्भवलेली असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलला समर्थन दिले आहे. काँग्रेस पक्षाकडून सुद्धा या युद्धाबाबतची आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. काँग्रेसने इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत या संदर्भातील एक ठराव पक्षाने आपल्या कार्यकारिणीमध्ये मंजूर केला आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षामध्ये मृत लोकांचा आम्ही निषेध करत असून त्या प्रदेशात शांतता राखण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले आहे. (Israel-Palestine conflict: Congress condemns attack on Israel, supports Palestinian citizens)

हेही वाचा – Israel-Palestine conflict : इस्रायलचा गाझा पट्टीला घेराव; तीन लाख सैनिक पाहिल्यानंतर हमासने गुडघे टेकले!

- Advertisement -

काँग्रेसने आपल्या ठरावात आपल्या म्हटले आहे की, काँग्रेस इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये झालेल्या युद्धाबद्दल आणि हजारांहून अधिक लोकांच्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख आणि वेदना व्यक्त करते. लोकांच्या जमीन, स्वशासन आणि स्वाभिमान आणि सन्मानाने जगण्याच्या हक्कांसाठी दीर्घकालीन समर्थनाचा पुनरुच्चार काँग्रेस करते. तसेच, या प्रदेशात युद्धविराम घोषित करण्यात यावा आणि दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या या मुद्द्यांवर चर्चा करण्यात यावी आणि चर्चेतून हा प्रश्न सोडविण्यात यावा, असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेसने या ठरावाच्या माध्यमातून इस्त्रालयमधील पॅलेस्टाईन नागरिकांना देखील समर्थन दिले आहे. याबाबत त्यांनी ठरावात लिहिले आहे की, इस्रायली नागरिकांवर झालेल्या क्रूर हल्ल्यांचा देखील आम्ही निषेध करतो. पण पॅलेस्टाईनसंदर्भातील आपली भूमिका कायम आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या युद्धासंदर्भातील हा काँग्रेसचा समतोल राखण्यात येणारा ठराव आहे. इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन वादात काँग्रेसने सुरुवातीपासून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. हा प्रश्न चर्चेतून सोडवण्यात यावा, युद्ध यावर पर्याय नाही अशी भूमिका काँग्रेसची आहे. आताही काँग्रेसने हमास या दहशतवादी संघटनेच्या कृत्याचा निषेध केला.

- Advertisement -

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, ‘इस्रायलमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. आम्हाला युद्ध नको आहे, पण ते आमच्यावर लादले गेले आहे. हे युद्ध आम्ही सुरू केले नाही तर ते आम्ही संपवू. एक काळ असा होता की, ज्यू लोक राज्यहीन आणि निराधार होते पण आता नाही. इस्रायलवर हल्ला करून हमासने ऐतिहासिक चूक केली आहे हे आता त्यांना समजेल. इस्त्रायलच्या इतर शत्रूंना येणार्‍या काळासाठी लक्षात राहतील अशी किंमत आम्ही निश्चित करू.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -