घरदेश-विदेशIsrael-Palestine : इस्रायल-हमास युद्धामुळे भारतीय अभिनेत्रीच्या घरावर शोककळा; बहीण अन् मेहुण्याचा मृत्यू

Israel-Palestine : इस्रायल-हमास युद्धामुळे भारतीय अभिनेत्रीच्या घरावर शोककळा; बहीण अन् मेहुण्याचा मृत्यू

Subscribe

नवी दिल्ली : हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर 20 मिनिटांत सुमारे 5 हजार रॉकेट डागले होते. त्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel-Palestine conflict) मध्ये सुरु झाले असून आतापर्यंत 3 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर, 2800 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहे. या युद्धामुळे भारतातील टीव्ही अभिनेत्री मधुरा नाईकच्या घरावर शोककळा पसरली आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करताना खुलासा केला की, तिने इस्रायल-हमास युद्धात तिच्या कुटुंबातील सदस्य गमावले आहेत. (Israel Palestine Mourning at Indian actress Madhura Naik house due to Israel-Hamas war Death of sister and brother-in-law)

व्हिडिओमध्ये मधुरा नाईक म्हणाली की, मी भारतात जन्मलेली एक ज्यू आहे. भारतात आमच्यापैकी फक्त 3 हजार नागरिक राहतात. 7 ऑक्टोबरपूर्वी आम्ही आमच्या कुटुंबातील एक मुलगी आणि एक मुलगा गमावला. माझी बहीण ओदया आणि तिचा पती इस्रायल-हमास युद्धात मारले गेले आहेत. या दोघांचे निधन त्यांच्या दोन मुलांसमोर झाले. माझ्या कुटुंबाला यावेळी ज्या वेदना आणि त्रास सहन करावा लागत आहे, ते शब्दात मांडता येणार नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhura Naik 🧿 (@madhura.naik)

- Advertisement -

ज्यू असल्यामुळे टार्गेट केले गेले

मधुरा नाईकने आरोप केला की, “आज इस्रायल दु:खात आहे. हमासच्या आगीत लहान मुले, महिला आणि वृद्धांना लक्ष्य करण्यात येत आहे. काल मी माझ्या बहिणीचा आणि तिच्या पती आणि मुलांचा फोटो शेअर केला आहे.” जगाला आमची वेदना दिसावी म्हणून आणि पॅलेस्टिनी लोक कशाप्रकारे अपप्रचार करत आहेत हे पाहून मला धक्का बसला. मी ज्यू असल्यामुळे मला लाज वाटली, अपमानित केले गेले आणि लक्ष्य केले गेले.

- Advertisement -

मी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही

मधुरा म्हणाली, आज मला माझ्या भावना व्यक्त करायच्या होत्या. माझ्या अनुयायांना, मित्रांना, माझ्यावर प्रेम करणार्‍या लोकांना आणि मला पाठिंबा देणार्‍या लोकांना, ज्यांनी माझ्यावर फक्त प्रेम केले आणि ज्यांनी इतकी वर्षे माझी स्तुती केली, त्यांना मला सांगायचे होते की, पॅलेस्टाईन समर्थक प्रोपगंडा इस्त्रायली लोकांना मारेकरी म्हणून दाखवू इच्छितात. परंतु हे योग्य नाही. स्वतःचा बचाव करणे म्हणजे दहशतवाद नाही आणि मला हे स्पष्ट करायचे आहे की, मी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhura Naik 🧿 (@madhura.naik)

मधुरा नाईक कोण आहे?

मधुरा नायक ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने ‘प्यार की ये एक कहानी’, ‘इस प्यार को क्या नाम दूं’, ‘हमने ली है शपथ’ आणि ‘तुम्हारी पाखी’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -