घरदेश-विदेशइस्त्रो अवकाशात सोडणार ३० उपग्रह

इस्त्रो अवकाशात सोडणार ३० उपग्रह

Subscribe

पीएसएलव्ही सी-४३ च्या मदतीनं इस्त्रो गुरूवारी ८ देशाचे ३० उपग्रह अवकाशात सोडणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ३० पैकी २३ उपग्रह हे एकट्या अमेरिकेचे आहेत.

भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरो खोवला जाणार आहे. कारण इस्त्रो एकाच वेळी ८ देशाचे ३० उपग्रह अवकाशात सोडणार आहे. पीएसएलव्ही सी-४३ च्या मदतीनं इस्त्रो गुरूवारी ८ देशाचे ३० उपग्रह अवकाशात सोडणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ३० पैकी २३ उपग्रह हे एकट्या अमेरिकेचे आहेत. यासोबतच भारताचा हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग सॅटेलाइट देखील अवकाशात झेपावणार आहे. सतीश धवन अंतराळ केंद्रात बुधवारी पहाटे ५ वाजून ५८ मिनिटांनी उड्डाणाचे काउंटडाऊन सुरू होणार आहे. त्यानंतर गुरूवारी सकाळी ९ वाजून ५८ मिनिटांनी या उपग्रहांचे प्रक्षेपण होणार आहे. अमेरिकेशिवाय ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, फिनलँड, मलेशिया, नेदरलँड आणि स्पेन या देशांचे उपग्रह देखील अवकाशात झेपावणार आहेत. अवकाशात झेपावणाऱ्या ३० विदेशी उपग्रहांपैकी १ मायक्रो आणि २९ नॅनो उपग्रह आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -