घरदेश-विदेशसरसंघचालकांनी घेतली जेटलींची भेट

सरसंघचालकांनी घेतली जेटलींची भेट

Subscribe

जेटलींवर सध्या एम्स रूग्णालयामध्ये उपचार सुरू

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अरुण जेटली यांची अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत भेट घेतली. जेटली सध्या एम्स रूग्णालयामध्ये उपचार घेत आहे. दरम्यान, फुफ्फुसांमध्ये पाणी झाल्यामुळे श्वासोच्छवासात अडचणी येत असल्याने जेटलींना ९ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावर्षी मे महिन्यातदेखील त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अतिदक्षता विभागात उपचार सुरु

गेल्या काही दिवसांपासून जेटलीना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. शनिवारी जम्मू आणि काश्मीचे राज्यपाल सत्यपाल मलिक, बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनाइटेड चे अध्यक्ष नितीश कुमार, उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी एम्स रूग्णालयाला भेट दिली आणि जेटलींच्या आरोग्याची विचारपूस केली.

- Advertisement -

दिग्गजांकडून जेटलींच्या आरोग्याची विचारपूस

यासोबतच अरुण जेटली यांची भेट घेण्यासाठी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू , पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा सहित अनेक नेते आणि मंत्र्यांनी एमस् मध्ये हजेरी लावली होती.

तब्बेतीमुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतून घेतली माघार

तब्बेतीच्या कारणावरून अरुण जेटली यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. जेटली भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाचे सदस्य आहेत. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात जेटली यांनी अर्थ, संरक्षण, माहिती आणि प्रसारण, संसदीय कामकाज यासारखी अनेक खाती सांभाळली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -