घरदेश-विदेशLok Sabha 2024: हा फक्त ट्रेलर... लवकरच पूर्ण राज्याचा दर्जा; पंतप्रधान मोदींचं...

Lok Sabha 2024: हा फक्त ट्रेलर… लवकरच पूर्ण राज्याचा दर्जा; पंतप्रधान मोदींचं जम्मू-काश्मीरच्या जनतेला आश्वासन

Subscribe

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उधमपूरच्या जनतेला लवकरच जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळेल आणि विधानसभा निवडणुका होतील, अशी हमी दिली आहे.

उधमपूर: लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उधमपूरच्या जनतेला लवकरच जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळेल आणि विधानसभा निवडणुका होतील, अशी हमी दिली आहे. रॅलीला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, जम्मू आणि काश्मीरमध्येही विधानसभा निवडणुका होतील, जम्मू आणि काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळेल. तुम्ही तुमची स्वप्ने तुमच्या आमदारांसोबत, तुमच्या मंत्र्यांसोबत शेअर करू शकाल, असं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिलं. (Lok Sabha Election 2024 Prime Minister Narendra Modi s assurance to the people of Jammu and Kashmir)

ऑक्टोबर 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीर राज्याची केंद्रशासित प्रदेशात पुनर्रचना करण्यात आली. त्याच वर्षी जम्मू-काश्मीर पुनर्रचना कायद्यांतर्गत कलम 370 रद्द करण्यात आले. सार्वत्रिक निवडणुका या केवळ खासदार निवडण्यासाठी नसून देशात एक मजबूत सरकार बनवण्यासाठीही असतात, असेही पंतप्रधानांनी आपल्या सभेत सांगितले.

- Advertisement -

उधमपूरच्या सभेत PM मोदी काय म्हणाले?

गेल्या 10 वर्षांत दहशतवादी आणि भ्रष्ट लोकांवर कारवाई करण्यात आली. येत्या पाच वर्षांत या क्षेत्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेले पाहिजे. जम्मू असो की काश्मीरमध्ये आता येथे पर्यटक आणि भाविक विक्रमी संख्येने येऊ लागले आहेत. आधुनिक बोगदे, आधुनिक रुंद रस्ते तयार करण्यात आले आहेत. आता इथे शाळा जाळल्या जात नाहीत, तर शाळा सजवल्या जातात. गेल्या 60 वर्षांपासून सुरू असलेल्या समस्या मार्गी लागल्या आहेत. पुढील 5 वर्षांसाठी मोफत रेशनची हमी देखील नरेंद्र मोदी यांनी दिली. रस्ते, वीज, पाणी, प्रवास आणि स्थलांतर, सर्व उपलब्ध असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं.

उधमपूरमधून जितेंद्र सिंह मैदानात

भारतीय जनता पक्षाने उधमपूरमधून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली आहे, ते 2014 पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. सिंह यांनी 2014 मध्ये उधमपूरमधून जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांचा पराभव केला होता.

- Advertisement -

(हेही वाचा Photo : चीनच्या सीमेवर भारतीय लष्कराने डागले अँटी-टँक गाइडेड मिसाइल)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -