घरदेश-विदेशअरे हे काय? चक्क पोलिसालाच चालकाने उचलले बोनेटवर

अरे हे काय? चक्क पोलिसालाच चालकाने उचलले बोनेटवर

Subscribe

वाहतूक पोलिसांना नेहमीच टीकेचे धनी केले जाते. पण या व्हिडिओनंतर नेटीझन्सनी चालकाची चूक असल्याचे म्हटले आहे.

वाहतूक पोलिसांना दंड वसूल करण्यासाठी अग्निदिव्यातून जावे लागते. चुका असूनही अनेकदा चालक दंड देण्यासाठी तयार नसतात, अशा तक्रारी वाहतूक पोलीस करतात. शिवाय पोलीस चुकीचा दंड वसूल करतात अशा तक्रारी चालक देखील करतात. पण दिल्लीतील गुरुग्राममध्ये तर एका चालकाने वाहतूक पोलिसांना न जुमानता त्यांना चक्क बोनेटवर उचलून घेतले. त्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

पाहा व्हिडिओ

- Advertisement -

नेमकं काय घडलं ?

सिग्नेचर टॉवर, गुरुग्राम येथे हा प्रकार घडला आहे. करण कठपाल असे या व्यक्तिचे नाव आहे. तो चुकीच्या दिशेने गाडी घेऊन जात असताना त्याला पोलिसाने अडवले. या ठिकाणी ट्राफिक वाचवण्यासाठी अनेक गाड्या चुकिच्या दिशेने गाड्या घेऊन जातात. असाच प्रकार करण कठपाल याने केला. त्याची गाडी अडवली असता पोलिसांना न जुमानता त्याने गाडी थेट पोलिसाच्या अंगावर नेली आणि त्याला बोनेटवर उचलून गाडी चालवली. चूक असूनही हा चालक आपली चूक मान्य करण्यास तयार नव्हता अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

नेटीझन्सची टीका

वाहतूक पोलिसांना नेहमीच टीकेचे धनी केले जाते. पण या व्हिडिओनंतर नेटीझन्सनी चालकाची चूक असल्याचे म्हटले आहे. शिवाय या भागात चालक मनमानी करत असल्याची टीका देखील केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -