घरदेश-विदेशगर्लफ्रेंडला अंडरवॉटर प्रपोज करणं पडलं महागात!

गर्लफ्रेंडला अंडरवॉटर प्रपोज करणं पडलं महागात!

Subscribe

आफ्रिकेत आपल्या गर्लफ्रेंडला समुद्रात पाण्याखाली प्रपोज करण्याकरिता गेला होता तरूण

आतापर्यंत आपण अनेकांना वेगवेगळ्या युक्ता करत आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करणारे बॉयफ्रेंड पाहिलेत. मात्र, परदेशातील टांझानिया, डोडोमा या ठिकाणी गर्लफ्रेंडला अंडरवॉटर प्रपोज करण्याचा प्लॅन अमेरिकन तरुणाच्या चांगलाच अंगाशी आला आहे. हा तरूण आफ्रिकेत आपल्या गर्लफ्रेंडला समुद्रात पाण्याखाली प्रपोज करण्याकरिता गेला होता. मात्र, प्रपोज करण्याच्या नादात तरूणाचा या समुद्रात बडून मृत्यू झाला.

अशी घडली घडला

मूळ अमेरिकेतील ल्युइजियाना प्रांताचा रहिवासी असलेला स्टीव्ह वेबर गर्लफ्रेण्ड केनेशा अँटोनेसबोत आफ्रिकेतील टांझानियाला गेला होता. प्रेयसीला लग्नाचा प्रस्ताव देण्याचं त्याने आधीपासूनच ठरवलं होतं. म्हणून या तरूणाने आपल्या गर्लफेंडला इम्प्रेस करण्याच्या तयारीत होता. त्यामुळे त्याने वेगळाच प्लॅन करण्याचे ठरविले होते.

- Advertisement -

त्यामुळे, केनेशा नाव असणारी तरूणी एका पाणबुडीतून समुद्राखाली गेली, तर स्टीव्हने समुद्रात उडी मारुन तिच्या पाणबुडीच्या काचेवर एक कागद धरला. ‘तुझ्याबद्दल मला काय काय आवडतं, हे सांगण्याइतका काळ मी श्वास रोखून धरु शकत नाही. मात्र माझं तुझ्यावर नितांत प्रेम आहे.’ असं प्रपोज त्याने त्या तरूणीला केलं. त्यानंतर अंगठी दाखवून तो पाणबुडीसमोरुन निघून गेला. मात्र तो पुन्हा परतलाच नाही. समुद्राच्या पाण्यात बुडून स्टीव्हचा मृत्यू झाला होता.

स्टीव्हचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानंतर केनेशाने एका फेसबुक पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. यानंतर स्टीव्ह आणि केनेशा यांना न ओळखणाऱ्यांनी देखील त्यांची करुण प्रेमकहाणी वाचून हळहळ व्यक्त केली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -