घरदेश-विदेशMary Millben: 'पंतप्रधान मोदीच भारतासाठी सर्वोत्कृष्ट'; हॉलिवूड गायिकेने सांगितली अमेरिकन नागरिकांची इच्छा

Mary Millben: ‘पंतप्रधान मोदीच भारतासाठी सर्वोत्कृष्ट’; हॉलिवूड गायिकेने सांगितली अमेरिकन नागरिकांची इच्छा

Subscribe

'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारत आणि भारत-अमेरिका संबंधांसाठी सर्वोत्तम नेते आहेत, असं आफ्रिकन-अमेरिकन हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका मेरी मिलबेन यांनी म्हटलं आहे.

Mary Millben: ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारत आणि भारत-अमेरिका संबंधांसाठी सर्वोत्तम नेते आहेत, असं आफ्रिकन-अमेरिकन हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका मेरी मिलबेन यांनी म्हटलं आहे. ती म्हणाली की, अमेरिकेतील अनेकांना वाटत की, पंतप्रधान मोदींनी पुन्हा निवडणुका जिंकाव्यात, जेणेकरून दोन्ही देशांमधील संबंध आणखी घट्ट होऊ शकतील. मिलबेन म्हणाली की, त्यांना असे वाटते की पंतप्रधान मोदी मे महिन्यात होणाऱ्या निवडणुका जिंकण्याच्या मार्गावर आहेत. (Mary Millben Prime Minister Narendra Modi Best for India The Hollywood singer expressed the desire of American citizens)

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मेरी मिलबेन म्हणाली, ‘मी तुम्हाला सांगते की, अमेरिकेत पंतप्रधान मोदींना प्रचंड पाठिंबा आहे. माझा विश्वास आहे की अनेकांना मोदी पुन्हा निवडून आलेले पाहायचे आहेत कारण ते भारतासाठी सर्वोत्तम नेते आहेत. मेरी मिलबेनचे भारतात खूप मोठे चाहते आहेत. तिने भारतीय राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आणि ‘ओम जय जगदीश हरे’ हे हिंदू गाणेही गायले आहे.

- Advertisement -

मिलबेन यांनी भारतीयांना मतदान करण्याचे केले आवाहन

मेरी मिलबेन म्हणाल्या, ‘मला विश्वास आहे की हा निवडणूक हंगाम अमेरिका, भारत आणि जगासाठी सर्वात महत्त्वाचा निवडणूक हंगाम असणार आहे. त्यामुळे नागरिक म्हणून आपल्या सर्वांवर मोठी जबाबदारी आहे आणि ती आपल्याला पार पाडायची आहे. मिलबेन यांनी भारतीयांना मतदान करण्याचे आवाहनही केले आहे.

पंतप्रधान मोदी हे भारतासाठी सर्वोत्तम नेते आहेत: मिलबेन

मिलबेन म्हणाली की, ‘हे गुपित नाही, संपूर्ण भारताला माहीत आहे की मी पंतप्रधान मोदींची मोठी समर्थक आहे आणि मला वाटते की ते भारतासाठी सर्वोत्तम नेते आहेत. भारत-अमेरिका संबंधांसाठी ते एक चांगले नेते आहेत. आपल्या देशात बदल घडवून आणण्याची ताकद आपल्यात आहे, हे मोदींनी दाखवून दिलं आहे.

- Advertisement -

अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांत निवडणुका

देशात यंदा लोकसभा निवडणुका होणार असून, त्यासाठी मार्च-एप्रिलमध्ये मतदान होऊ शकते. अमेरिकेतही याच वर्षी नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. मेरी मिलबेन अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देत आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या राज्य दौऱ्यावर गेले होते, तेव्हा मेरी मिलबेन यांनी एका कार्यक्रमात भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ गायले होते. तेव्हापासून ती भारतात खूप लोकप्रिय झाली आहे.

(हेही वाचा Aaditya Thackeray : खर्च मोठा, पण काम शून्य; दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -