घरदेश-विदेशनक्षलवाद्यांनी शांततेच्या मार्गाने देशाच्या मुख्य प्रवाहात यावे- रामदास आठवले

नक्षलवाद्यांनी शांततेच्या मार्गाने देशाच्या मुख्य प्रवाहात यावे- रामदास आठवले

Subscribe

छस्तीसगढमधील जाहिर सभेत केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी 'नक्षलवाद्यांनी शांततेच्या मार्गाने देशाच्या मुख्य प्रवाहात यावे', असे आवाहन केले आहे.

लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत. प्रचाराच्या रिंगणात सर्व पक्ष उतरली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान, छस्तीसगढमध्ये रिपब्लिकन पक्षाचे २ उमेदवार लोकसभा निवडणुकीमध्ये लढत लढणार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी रिपाइ पक्षाने छस्तीसगढमध्ये जाहिर सभेचे आयोजन केले होते. तसेच त्या जाहिर सभेत केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. त्या सभेमध्ये रामदास आठवले म्हणाले की, ‘नक्षलवाद्यांना जर गरीब आदिवासींना न्याय द्यायचा असेल तर त्यांनी नक्षलवाद सोडून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेल्या शांततेच्या मार्गाने देशाच्या मुख्य प्रवाहात यावे’, असे आवाहान दिले आहे. तसेच ‘नक्षलवाद्यांनी बुलेट चा मार्ग सोडून बॅलेटचा मार्ग स्वीकारावा’ असेही त्यांनी म्हटले आहे.

आठवल्यांनी दिले आवाहन

छत्तीसगढमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी ११ जागा असून त्यापैकी २ जागांवर रिपाइ स्वबळावर निवडणूक लढत असून अन्य ९ जागांवर भाजपला उमेदवार लढणार आहे. त्यांना रिपाइने पाठिंबा दिला आहे. तसेच छत्तीसगढमध्ये भाजपच्या यंदा किमान ८ जागा निवडणुकीत निवडून येतील असा अंदाज ही रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मागील ५ वर्षांत चांगले काम केले असून त्यांना पुन्हा केंद्रातमध्ये देशसेवेची संधी देण्यासाठी भाजप एनडीएच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन आठवले यांनी केले आहे. नक्षलवाद्यांनी निवडणुकीला विरोध करताना काही भागात कार्यकर्त्यांवर पोलिसांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्याचा निषेध करून रामदास आठवले यांनी नक्षलवाद्यांनी मुख्यप्रवाहात यावे, असे आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -