घरदेश-विदेशसुशीलकुमार शिंदे, मीरा कुमार की अशोक गेहलोत नवा काँग्रेसाध्यक्ष जूनमध्ये?

सुशीलकुमार शिंदे, मीरा कुमार की अशोक गेहलोत नवा काँग्रेसाध्यक्ष जूनमध्ये?

Subscribe

काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांना प्रकृती अस्वस्थतेमुळे त्या पदावर फार काळ राहणे शक्य नाही. ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष होण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत जून २०२१मध्ये काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडण्यात येईल, अशी घोषणा सोनिया गांधी यांनी केली आहे.

मात्र हा अध्यक्ष गांधी कुटुंबाबाहेरील असेल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आल्याचे खात्रीलायक समजते. त्यामुळे काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या बैठकीत ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि गांधी कुटुंबियांचे निष्ठावान सुशीलकुमार शिंदे, माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार आणि राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची नावे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद देण्यात आले. परंतु त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे आता काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशा नावे चर्चेत आहेत जी गांधी कुटुंबाच्या विश्वासातील आहेत आणि काँग्रेसच्या विचारांची आहेत. यामध्ये सुशीलकुमार शिंदे, मीरा कुमार आणि अशोक गेहलोत ही तीन नावे पुढे आली आहेत. मीरा कुमार यांचा राजकारणातला अनुभव कमी आहे तर अशोक गेहलोत राज्य सोडण्यास अनुत्सुक आहेत. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठी माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याचे म्हटले जात आहे.

दिल्लीतील एका गटाकडून सुशील कुमार शिंदे यांच्या नावाचे संकेत मिळत आहे. मात्र शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी यात तथ्य नसल्याचे सांगितले आहे. शुक्रवारी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत अध्यक्षपद निश्चित होईल असे सांगितले जात होते. मात्र बैठकीत वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मुकूल वासनिक आणि पी. चिदंबरम यांनी तात्काळ संस्थात्मक मतदान केले जावे, अशी मागणी केली.

- Advertisement -

दुसरीकडे गांधींचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे अशोक गेहलोत, अमरिंदर सिंग, ए. के. अँटनी, तारिक अन्वर यांनी बंगाल आणि तामिळनाडू यांच्यासहित पाच राज्यांमधील निवडणुका झाल्यानंतर अध्यक्षपदाबाबत निर्णय घेतला जावा अशी भूमिका मांडली. यावेळी एका नेत्याने म्हटले की, आपण नेमक्या कोणाच्या अजेंड्यासाठी काम करत आहोत? भाजपा आपल्याप्रमाणे अंतर्गत राजकारणावर चर्चा करत नाही? त्यांची प्राथमिकता आधी राज्यांच्या निवडणुका आणि नंतर संस्थात्मक निवडणुका असतात.अखेर दुसर्‍या गटाने माघार घेतली. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तारखेची घोषणा सोनिया गांधी करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -