घरदेश-विदेशपाकिस्तान अझहर विरोधात करणार कारवाई?

पाकिस्तान अझहर विरोधात करणार कारवाई?

Subscribe

पाकिस्तानी नागरिक असलेल्या मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याविषयीचा ठराव आतापर्यंत चारवेळा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत करण्यात आला आहे.

पाकिस्तान सरकार जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर विरोधात लवकरच कारवाई करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये वाढत असलेला तणाव कमी करण्याच्या हेतूने पाकिस्तान हे पाऊल उचलणार असल्याचं समजतंय. एका खासगी वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी सरकारच्या सूत्रांच्या सांगण्याप्रमाणे मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याविरोधात पाक सरकारने घेतलेला पवित्राही आता ते मागे घेण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी नागरिक असलेल्या मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याविषयीचा ठराव आतापर्यंत चारवेळा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत करण्यात आला आहे.

निर्णय पाकिस्तानचा…

समोर आलेल्या वृत्तानुसार या प्रकरणाशी संबंधित सुरक्षा अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, ‘देशाचे हित लक्षात घेता मसूद अझहरसारख्या दहशतवाद्याला पाठीशी घालायचे की स्वत:च्या देशाच्या सुरक्षिततेसाठी त्याच्याविरुद्ध आवश्यक कारवाई करायची? हा निर्णय सर्वस्वी पाकिस्तान सरकारने घ्यायचा आहे.’ दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी खरोखरंच अझहरविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला तर दोन्ही देशातील तणाव कमी होण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल असं मतही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. याआधी पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांना कोणत्याही अटींशिवाय भारतात परत पाठवण्याचा निर्णय घेतल्यामुळे सुदैवाने या मुद्द्यावरुन दोन्ही देशातील परिस्थीती अधिक चिघळली नाही.

- Advertisement -

अझहर जिवंत की…

सध्या पाकिस्तानी माध्यमांकडून दिल्या जाणाऱ्या वृत्तानुसार, मसूद अझहर मृत्यू पावल्याच्या बातम्या अफवा
असून तो जिवंत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तर टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रविवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास पाकिस्तानी लष्कराने मसूदला रावळपिंडी येथील रुग्णालयातून बहावलपूरमधील गोथ गन्नी येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हलवले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -