घरदेश-विदेशपी. व्ही सिंधूने घेतले पंतप्रधान मोदींचे आशीर्वाद

पी. व्ही सिंधूने घेतले पंतप्रधान मोदींचे आशीर्वाद

Subscribe

पी. व्ही. सिंधू म्हणजे देशाचा अभिमान, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक

जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारताच्या बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत विजय संपादित केल्याबद्दल तसेच पहिल्यांदा सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल मोदींनी सिंधू यांचे अभिनंदन केले. त्यानंतर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील पाठविल्या. यावेळी जेष्ठ बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक पुलेला गोपीचंद उपस्थित होते.

- Advertisement -

‘भारताची मान पुन्हा एकदा उंचावली’

रविवारी आपल्या ट्विटर संदेशात मोदी म्हणाले, “विलक्षण गुणवत्तेच्या पी व्ही सिंधूने जगात भारताची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन! ज्या चिकाटीने आणि समर्पित वृत्तीने तिने बॅडमिंटन खेळात प्रावीण्य मिळवले आहे, ते खरोखरच प्रेरणादायी आहे. तिच्या या यशामुळे अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळेल.”

यापूर्वी पी व्ही सिंधू यांनी केंद्रीय युवा आणि क्रीडा राज्यमंत्री किरण रिजीजू यांची भेट घेतली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मिळालेल्या यशा बद्दल रिजीजू यांनी १० लक्ष रुपयांचा धनादेश बक्षीस म्हणून पी व्ही सिंधू यांना प्रदान केला.

- Advertisement -

दिग्गजांकडून पी व्ही सिंधूचे होतेय अभिंनदन

जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल राष्टपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय युवा आणि क्रीडा राज्यमंत्री किरण रिजीजू आणि अन्य मंत्री आणि सुविख्यात नागरिकांनी पी व्ही सिंधू यांचे अभिंनदन केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -