घरदेश-विदेशभारत-चीन सीमेवर धावणार रेल्वे

भारत-चीन सीमेवर धावणार रेल्वे

Subscribe

दिल्लीपासून ते लेह-लडाखपर्यंत रेल्वे बांधण्यात येणार आहे. या रेल्वे लाईनचे खास महत्व आहे. रेल्वे प्रकल्पामुळे दिल्लीहून लडाखला जाण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे.

भारत-पाक सीमेलगत असलेले लेह-लडाख हे नेहेमीच वादाचे कारण राहिले आहे. भारतीय रेल्वे आता दिल्लीपासून लेह-लडाखपर्यंत रेल्वे लाईन बांधणार आहे.दिल्लीला लेह-लडाखशी जोडण्याचा प्रयत्न रेल्वेद्वारे केला जात आहे. रेल्वे लाईन बांधण्याचे काम पूर्ण झाल्यावर ही जगातील सर्वात उंच रेल्वे लाईन ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. याव्यतिरिक्त भारत-चीन सीमारेषेवर असल्यामुळे या प्रकल्पाकडे जगाचे लक्ष लागले आहे. या रेल्वे प्रकल्पाचे राजकारणातही विशेष महत्व असून शेजारी चीनही या प्रकल्पाकडे अधिक बारकाइने लक्ष ठेवत आहे. या रेल्वे प्रकल्पाचे नाव बिलासपुर-मनाली-लेह लाईन असे ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पाला तीन टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात रेल्वे लाईनच्या पाहाणीचे काम पूर्ण होणार आहे. या रेल्वे प्रकल्प म्हणजे आतापर्यंतचा सर्वात कठीण काम असं म्हटले जातेयं. बांधकामादरम्यान अनेक दुर्गम क्षेत्रातून रेल्वे लाईन बांधणे हे एक मोठं आव्हान आहे.

प्रकल्पातील महत्वाच्या गोष्टी

– बिलासपुर-मनाली-लेह प्रकल्पाचा ८३ हजार ३६० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. ही रेल्वे लाईन ४६५ किलोमीटर दरम्यान बांधण्यात येईल.
– ही रेल्वे लाईन जगातील सर्वात उंच रेल्वे लाइन ठरणार आहे. रेल्वे लाईनची उंची समुद्र सपाटीपासून ५ हजार ३६० मीटर असेल.
– रेल्वे लाईन दरम्यान भारत-चीन सीमेवरील ३० रेल्वे स्थानक असणार आहेत. बिलासपुर आणि लेहला जोडल्या गेलेली ही लाईन सुंदरनगर, मंडी, मनाली, कीलोंग, कोकसर, दर्चा, उपशी आणि कारू अशा मुख्य स्थानकांची नावे असतील
– या प्रकल्पाची मदत भारतीय सैन्य दलाला होणार असून याचबरोबर लडाख क्षेत्रात पर्यटनालाही चालना मिळणार आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत हा प्रकल्प तयार करण्यात आला तर केंद्राला सर्व खर्च उचलावा लागेल यामुळे हा प्रकल्प लवकर होण्याची शक्यता आहे.
– ४६५ किलोमीटर लांब असलेल्या रेल्वे लाईनचा ५२ टक्के भाग बोगद्यातून जाणार आहे. प्रकल्पात सर्वात मोठा बोगदा २७ किलोमीटरचा असणार आहे.
– या प्रकल्पाच्या सर्वेक्षणावर ४५७.७२ करोड रूपये खर्च होणार आहेत. या लाईनवर प्रतीतास ७५ किलोमीटर वेगाने रेल्वे धावणार आहे. ही लाईन बनवल्यानंतर दिल्लीहून लेह-लडाखला जाण्यासाठी ४० तासा ऐवजी २० तास लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -