घरदेश-विदेशमोदीजी, 'भाजपाच्या आयटी सेलला अफवा न पसरवण्याचे आवाहन करा'

मोदीजी, ‘भाजपाच्या आयटी सेलला अफवा न पसरवण्याचे आवाहन करा’

Subscribe

'भाजपाच्या आयटी सेलला शांत राहण्याचे आणि अफवा न पसरवण्याचे आवाहन करा', असा टोला अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मोदींना लगावला आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ईशान्य राज्यात सुरू झालेल्या आंदोलनाची आग ही देशभरात पसरली आहे. या आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. दिल्लीतही जामिया मिलीया विद्यापीठात या कायद्याविरोधात आंदोलने देखील झाली. या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन लोकांना शांततेचे आवाहन केले. या ट्विटला अभिनेत्री रेणुका शहाणेने रिट्विट करत भाजपाच्या आयटी सेलला शांत राहण्याचे आणि अफवा न पसरवण्याचे आवाहन करा, असे मोदींना सांगितले आहे.

रेणुका शहाणे काय म्हणाल्या?

सर, तुम्ही कृपया तुमच्या सर्व आयटी सेटला ट्विटर हँडलपासून दूर राहण्याचे आवाहन करा. कारण जास्तीत जास्त अफवा या त्यांच्याकडून पसरवल्या जात आहेत. त्यांच्या या पसरवल्या जाणाऱ्या माहितीमुळे भ्रम वाढत असून खोटी माहिती पसरली जात आहे. ती देशातील शांती, एकात्मतेच्या विरोधात आहे. तुमची आयटी सेल खरी तुकडे – तुकडे गँग आहे. त्यामुळे कृपया त्यांना द्वेष पसरवण्यापासून थांबवा.

- Advertisement -

रेणुका शहाणेंचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपसह हजारो युजर्सनी रेणुका शहाणेंचे ट्विट रिट्विट केले आहे.
काय म्हणाले होते पंतप्रधान

- Advertisement -

नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या हिंसाचारावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, हे सर्व दुर्दैवी आणि त्रासदायक आहे, अशी प्रतिक्रिया ट्विटवरुन दिली. मोदी यांनी एकमागोमाग एक ट्विट करत सध्या सुरु असलेल्या हिंसाचारावर नाराजी व्यक्त करत शांतता राखण्याचे आवाहन केले होते. ‘सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेली हिंसक निदर्शने दुर्दैवी आणि खूप त्रासदायक आहेत. वादविवाद, चर्चा आणि मतभेद हे लोकशाहीचे भाग आहेत. पण सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे तसेच दैनंदिन आयुष्यात बाधा निर्माण करणे आपल्या नैतिकतेला धरुन नाही,’ असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. मोदींच्या याच ट्विटला कोट करुन रेणुका शहाणे यांनी मोदींना तसेच भाजपाच्या आयटी सेलला टोला लगावला आहे.


हेही वाचा – नागपुरात ‘तुम्ही पुन्हा येणार’चे झळकले बॅनर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -