घरदेश-विदेशRussia-Ukraine war : बायडेन यांचे पुतिन कुटुंबीयांवर निर्बंध, दोन्ही मुलींची केली आर्थिक...

Russia-Ukraine war : बायडेन यांचे पुतिन कुटुंबीयांवर निर्बंध, दोन्ही मुलींची केली आर्थिक कोंडी

Subscribe

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 40 दिवसांहून अधिक काळ युद्ध सुरु आहे. बुचा शहरातील नरसंहाराच्या घटनेनंतर पाश्चात्य देशांनी पुन्हा एकदा रशियाविरोधात आजाव उठवला आहे. या ताज्या घडामोडींनंतर अमेरिकेने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या कुटुंबियांविरोधात कडक निर्बंध लादले आहेत. पुतिन यांच्या दोन मुलींवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. पुतीन यांच्या दोन मुलींशिवाय व्हाईट हाऊसने रशियातील अनेक बड्या नेत्यांवर आणि अनेक बँका आणि व्यावसायिकांवरही बंदी घातली आहे. अमेरिकेने रशियाच्या सर्वोच्च सार्वजनिक आणि खाजगी बँकांवर बंदी घातली आहे. व्हाईट हाऊसने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दोन मुली मारिया वोरोंत्सोवा आणि केटेरिना तिखोनोव्हा यांच्यावर निर्बंध लादले आहेत. पुतीनच्या या दोन्ही मुली माजी पत्नी ल्युडमिला शेक्रेबनेवा यांच्या आहेत.

पुतिन कुटुंबावर निर्बंध

अमेरिकेने रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावारोव आणि रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव आणि पंतप्रधान मिखाईल मिशुस्टिन यांच्यासह रशियन सुरक्षा परिषदेच्या सदस्यांवरही निर्बंध लादले आहेत. व्हाईट हाऊसने एका निवेदनात म्हटले आहे की, “या व्यक्तींनी रशियन लोकांच्या खर्चावर स्वतःला समृद्ध केले आहे, त्यापैकी काही युक्रेनवरील युद्धात पुतीन यांना मदत करत आहेत.”

- Advertisement -

अमेरिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पुतिन यांची बहुतांश संपत्ती त्यांच्या कुटुंबाकडे लपवून ठेवण्यात आली आहे, यामुळेच आता आम्हाला त्यांच्या कुटुंबियांवरील निर्बंधांची व्याप्ती वाढवायची आहे. व्हाईट हाऊसने एका निवेदनात असेही म्हटले आहे की, रशियाची सर्वात मोठी सरकारी सब्रबँक आणि खाजगी अल्फा बँकेवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. आता या दोन बँकांकडून कोणत्याही प्रकारची गुंतवणूक अमेरिकेत करता येणार नाही.

बुचाच्या घटनेमुळे अमेरिका संतप्त

व्हाईट हाऊसने असेही म्हटले आहे की, गुरुवारी रशियाच्या सरकारी कंपन्या आणि संस्थांवर निर्बंध लादण्याची घोषणा केली जाईल. या कंपन्यांवर बंदी घालण्याचा उद्देश त्यांच्या जागतिक आर्थिक व्यवस्थेची क्षमता पूर्णपणे नष्ट करणे हा आहे. रशियावरील निर्बंधांची व्याप्ती वाढवण्याला बुचा येथील नरसंहार घटनेशी जोडले जात आहे. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी निर्बंधांच्या वाढीचा थेट संबंध पुराव्यांशी जोडला आहे की, रशियन सैन्याने कीवला लागून असलेल्या बुचा शहरात जाणूनबुजून नागरिकांची हत्या केली आहे. बुचा घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन चांगलेच संतापले आहेत. बायडेनने ट्विटमध्ये लिहिले की, मला हे स्पष्ट करायचे आहे की, बुचाच्या क्रूर हत्येची रशिया लगेचच मोठी किंमत मोजेल.


ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी देण्याचे हायकोर्टाचे आदेश

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -