घरदेश-विदेशसत्यपाल मलिकांची सीबीआयकडून सात महिन्यात दुसऱ्यांदा चौकशी

सत्यपाल मलिकांची सीबीआयकडून सात महिन्यात दुसऱ्यांदा चौकशी

Subscribe

एका कथित विमा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून सत्यपाल मलिक यांची चौकशी करण्यात येत आहे. याबाबतची नोटीस सत्यपाल मलिक यांना मागील आठवड्यात सीबीआयकडून पाठवण्यात आली होती.

जम्मू-काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरले आहेत. मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत केलेल्या गौप्यस्फोटानंतर त्यांच्यावर केंद्राकडून निशाणा साधण्यात येत आहे. पण आता एका कथित विमा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. याबाबतची नोटीस सत्यपाल मलिक यांना मागील आठवड्यात देण्यात आली होती.

सत्यपाल मलिक यांना मिळालेल्या नोटीसीप्रमाणे आज (ता. 28 एप्रिल) शुक्रवारी त्यांच्या दिल्लीतील सोम विहार या ठिकाणी असलेल्या घरी सीबीआयचे पथक पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साधारतः पावणे बाराच्या सुमारास सीबीआयचे पथक सत्यपाल मलिक यांच्या घरी चौकशीसाठी पोहोचले. मलिक अद्यापही या विमा प्रकरणामध्ये आरोपी म्हणून निश्चित झालेले नाहीत, परंतु तरी देखील या प्रकरणामध्ये त्यांची चौकशी करण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सात महिन्यांत दुसऱ्यांदा सत्यपाल मलिक यांची या प्रकरणात चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, सीबीआयने याच महिन्यात त्यांना चौकशीची नोटीस पाठवली होती. या नोटीसीमध्ये त्यांनी 27 किंवा 28 एप्रिलला सीबीआयकडून चौकशी करण्यात येईल, असे लिहिले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Vande Bharat Express Accident: वंदे भारत एक्स्प्रेसला पुन्हा अपघात; गायीला धडक

जम्मू- काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारबाबत एक खळबळजनक वक्तव्य केले होते. पुलवामा हल्ल्याच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी गप्प राहण्याचे निर्देश दिले होते, असा गौप्यस्फोट द व्हायरल या माध्यमाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सत्यपाल मलिक यांनी केला होता. तसेच, पुलवामामध्ये CRPF च्या 40 जवानांनी विमानाची मागणी केली होती. त्यांना केवळ 5 विमानांची आवश्यकता होती. मात्र गृहमंत्रालयाने त्यांना विमानं दिली नाही ही चूक केली आणि त्यामुळे 40 जवानांना आपला जीव गमवावा लागला, असा खुलासा देखील मलिक यांनी या मुलाखतीमध्ये केला होता. मलिक यांच्या खळबळजनक वक्तव्यानंतर काँग्रेसने देखील केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.

- Advertisement -

अनेक दिवसांपासून सत्यपाल मलिक हे केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. किसान विधेयकाविरोधात धरणे धरणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थही ते बोलले होते. त्यादरम्यान त्यांनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या विधेयकालाही विरोध केला होता. केंद्राचे तीन कृषी कायदे रद्द करणे हा शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय असल्याचे ते म्हणाले होते. तर सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मिरचे राज्यपाल असताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -