घरदेश-विदेशMata Vaishno Devi : वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी; १२ भाविकांचा मृत्यू, १४...

Mata Vaishno Devi : वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी; १२ भाविकांचा मृत्यू, १४ हून अधिक जखमी

Subscribe

जम्मू काश्मीरमध्ये नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत वाईट घटनेने झाली आहे. जम्मूमधील कटरा इथल्या वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरीची भीषण घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत १२ भाविकांचा मृत्यू झाला आहे तर १४ हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. मृत्यांमध्ये दोन महिला भाविकांचा समावेश आहे.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वैष्णोदेवी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. याचदरम्यान मध्यरात्री २.४५ वाजता ही चेंगराचेंगरीची घटना झाली. या दुर्घटनेबाबत पंतप्रधान मोदी यांनी देखील दु:ख व्यक्त केलं आहे. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांच्या माहितीनुसार, काही कारणावरून भाविकांमध्ये झालेल्या वादातून एकमेकांना धक्काबुक्की झाली त्यानंतर चेंगराचेंगरी झाली आहे.

- Advertisement -

कटरा हॉस्पिटलचे बीएमओ डॉ गोपाल दत्त यांनी मृत्यूची पुष्टी केली आहे. सध्या जखमींना नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला १४ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे, त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडाही वाढू शकतो असे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत लिहिले की “माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत भाविकांच्या झालेल्या मृत्यूमुळे मला खूप दुःख झाले आहे. पीडितांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. देव जखमींना लवकर बरे करो. मी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिंहा, उधमपूरचे खासदार डॉ जितेंद्र सिंह आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्याशी बोललो आणि परिस्थितीची माहिती घेतली. जखमींना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नववर्षाच्या स्वागतासाठी भाविकांची गर्दी

नववर्षानिमित्त दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक माता वैष्णोदेवीच्या मंदिरात येत असतात. यादरम्यान भाविकांच्या सोयीविषयी विशेष काळजी घेतली जाते. मात्र शनिवारी नववर्षानिमित्त येथे मोठी गर्दी जमली. आणि यावेळी चेंगराचेंगरी होत १२ भाविकांचा मृत्यू झाला.

राहुल गांधींनीही व्यक्त केला शोक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही माता वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, पीडितांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -